डोंबिवलीच्या सुप्रसिद्ध ‘रिलस्टार’नं एकीला 92 लाखांना, तर दुसरीला 22 लाखांना लुबाडलं, काय घडलं?
Dombivli Reel Star Shailesh Ramugade Case : सोशल मीडियावर (Social Media) 8 लाखांहून अधिक फॉलोअर्स असलेला डोंबिवलीचा (Dombivli) रिलस्टार शैलेश रामगुडेचा (Shailesh Ramugade) पाय आणखी खोलात गेल्याचं दिसतंय. आधीपासून तुरूंगात असलेल्या शैलशचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. 92 लाखांच्या फसवणूक प्रकरणात तुरुंगात असलेल्या शैलेशनं मुंबईतील एका आयटी इंजिनिअर तरुणीला 22 लाखांना लुबाडल्याचा आरोप केला जातोय. त्यामुळे आता रिलस्टार शैलेश रामगुडेचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे.
सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या शैलेशनं मुंबईतील (Mumbai News) एका आयटी इंजिनीअर (IT Engineer) तरुणीची 22 लाखांना फसवणूक केलीय. शैलेशनं इंस्टाग्रामच्या माध्यमातून तरुणीशी ओळख वाढवली आणि त्यानंतर तिची 22 लाख रुपयांना फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. लग्नाचं अमिष दाखवून शैलेशनं तरुणीची फसवणूक केल्याची माहिती मिळतेय.
31 वर्षांचा शैलेश रामगुडे आधीपासूनच एका फसवणूक प्रकरणात अडकला आहे. त्यानं थोडीथोडकी नाहीतर तब्बल 92 लाखांची फसवणूक केली आहे. भांडुप पोलिसांनी या प्रकरणी शैलेश रामुगडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शैलेशला 92 लाखांच्या फसवणुकीच्या अन्य प्रकरणात गेल्या महिन्यात विष्णूनगर पोलिसांनी अटक केली असून तो न्यायालयीन कोठडीत आहे. अशातच आता आणखी एक प्रकरण समोर आल्यामुळे त्याच्या अडचणींत वाढ होणार, यात काही शंका नाही.
“आधी मैत्री, मग प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, अन्…”
30 वर्षीय पीडित तरुणीची ओळख जानेवारी 2023 मध्ये इन्स्टाग्रामवरुन शैलेश रामुगडे याच्याशी झाली होती. त्याच्या हायप्रोफाईल जीवनशैलीला भुरळून तिनं आंधळेपणानं विश्वास ठेवण्यास सुरुवात केली. दोघे वाशी इथे प्रत्यक्ष भेटले आणि काही महिन्यांतच शैलेशनं तिला लग्नासाठी मागणी घातली. त्यामुळे तिनं शैलेशवर विश्वास ठेवला.
वेगवेगळ्या कारणांनी तरुणीकडून पैसे लाटले
शैलेशनं तरुणीच्या कुटुंबीयांनाही भेटून त्यांचाही विश्वास संपादन केलेला. यानंतर त्यानं फोटोशूटसाठी तब्बल 1.5 लाख रुपयांची मागणी केली, बीएमडब्ल्यू कार बुकिंगच्या नावाखाली 9 लाखांहून अधिक रक्कम तरुणीकडून घेतली. पुढे वडिलांचं आजारपण, नव्या कंपनीचे खर्च अशा कारणांवरून पैशांची मागणी सुरुच ठेवली. त्यानंतर शैलेशनं 27 फेब्रुवारी ते ऑक्टोबर 2023 दरम्यान तरुणीकडून घेतलेल्या 27 लाख रुपयांपैकी 5 लाख परत केले. पण, त्यानंतर मात्र उरलेले पैसे द्यायला मात्र शैलेशनं टाळाटाळ सुरू केली. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच, तरुणीनं पोलिसांत धाव घेत शैलेशविरोधात तक्रार दाखल केली. दरम्यान, पोलिसांकडून याप्रकरण अधिक तपास सुरू आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
आणखी वाचा
Comments are closed.