डोंबिवलीत भटक्या कुत्र्याची हत्या, दोघा रहिवाशांसह सुरक्षारक्षकावर गुन्हा
डोंबिवली जिमखाना रोडवरील सागर्ली परिसरात भटक्या कुत्र्याला बेदम मारहाण करून नंतर गळा आवळून त्याची हत्या केल्याची संतापजनक घटना घडली आहे. याप्रकरणी हिर राजपूत यांच्या तक्रारीवरून मानपाडा पोलिसांनी ओमकार केंद्रे, तुषार केंद्रे आणि सुरक्षारक्षक प्रकाश यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सुरेश कॉम्प्लेक्समध्ये शनिवारी मध्यरात्री हा प्रकार घडला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र चीड व्यक्त होत आहे. सोसायटीच्या आवारात फिरणाऱ्या भटक्या कुत्र्याला पकडून त्याला मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्याच्या गळ्यात दोरी बांधून त्याला ठार मारण्यात आला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्राणीप्रेमींमध्ये संताप व्यक्त होत आहे. पोलिसांकडून व्हिडीओसह अन्य पुराव्यांच्या आधारे अधिक तपास सुरू आहे.
Comments are closed.