ज्ञानेश कुमार यांनी सुप्रीम कोर्टाची दिशाभूल केलेली आहे, अशा व्यक्तीला निवडणूक आयुक्तपदाच्या खुर्चीवर राहण्याचा अधिकार नाही – संजय राऊत
मतदार यादीत नव्याने नाव नोंदवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या फॉर्म 6 मधील बदलाला आम्ही कधीच मान्यता दिली नव्हती, असे स्पष्ट करत, सर्वोच्च न्यायालयाने आज मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार, विवेक जोशी आणि सुखबीर सिंग संधू यांच्यासह केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे. त्यावर बोलताना शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी ज्ञानेश कुमार व सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली.
”सर्वोच्च न्यायालयाने काल स्पष्टपणे निवडणूक आयोगाचे कान टोचले आहे. फॉर्म 16 मधले बदल सर्वोच्च न्यायालयाच्या संमतीने केलेले नाहीत. सर्वोच्च न्यायालयाला अंधारात ठेवले आहे. ज्ञानेश कुमारने यांनी कोणता खेळ केलाय ते आता लक्षात येतंय, कोणत्याही बहुमताशिवाय व सहमतीशिवाय निवडणूक यंत्रणेत व पद्धतीत त्यांनी केलेले बदल धक्कादायक आहेत. सर्वोच्च न्यायालयाची ज्ञानेश कुमार यांनी दिशाभूल केलेली आहे, अशा व्यक्तीला निवडणूक आयुक्तपदाच्या खुर्चीवर राहण्याचा अधिकार नाही. जितके दिवस ज्ञानेश कुमार त्या खुर्चीवर राहतील तितके दिवस मोदी शहांचं अ:धपतन सुरुच राहिलं”, असे संजय राऊत म्हणाले.
Comments are closed.