ट्रम्प यांचा टॅरिफचा ‘तुघलकी’ डाव अमेरिकेच्या अंगलट; महागाई वाढल्याने टॅरिफ हटवला


मुंबई : जगभरातील देशांवर टॅरिफ लावण्याचा तुघलकी निर्णय घेऊन वेठीस धरणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांचा टॅरिफचा डाव आता त्यांच्याच अंगलट आल्याचं दिसून येतंय. टॅरिफ लावल्यामुळे अमेरिकेत महागाई (महागाई) वाढ झाली आणि त्यामुळे नागरिकांवर मोठा आर्थिक ताण वाढल्याचं दिसून आलं. या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प (डोनाल्ड ट्रम्प) यांनी काही वस्तूंवरील टॅरिफ (दरfs) कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. बीफ, कॉफी, चहा, केळी, फळं आणि काही कृषी संबंधित वस्तूंवरील शुल्क कमी केल्याने अमेरिकन ग्राहकांचा आर्थिक भार कमी होण्याची शक्यता आहे.

यूएस मध्ये वाढती महागाई: महागाईचा दबाव वाढला

अमेरिकेत गेल्या काही महिन्यांपासून खाद्यपदार्थांच्या किमती झपाट्याने वाढत आहेत. ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळे परदेशाती करण्यात येणाऱ्या आयात वस्तू महाग ठरत होत्या, त्याचा थेट परिणाम नागरिकांच्या खिशावर होत होता. याच कारणामुळे आता टॅरिफ कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

टॅरिफ कपात सह आयटम : कोणत्या वस्तूंवरील टॅरिफ कमी?

नवीन आदेशानुसार, खालील वस्तूंवरील आयात शुल्कात सवलत देण्यात आली –

कॉफी

गोमांस

चहा

केळी

काही फळं

खतं आणि कृषी संबंधित उत्पादनं

या वस्तू महत्त्वाच्या ग्राहक वस्तू असल्याने त्यांची किंमत आता कमी होण्याची शक्यता आहे.

यूएस दर भारतावर होणारा परिणाम: भारतासह इतर देशांनाही फायदा

अमेरिकेने काही वस्तुंवरील टॅरिफ कमी केल्यामुळे भारतासह इतर देशांमधून होणाऱ्या आयातीला प्रोत्साहन मिळू शकते. मोठ्या प्रमाणावर कॉफी, चहा आणि फळं निर्यात करणारे देश अमेरिकेच्या या निर्णयामुळे थेट फायद्यात राहतील. अमेरिकेने लावलेल्या टॅरिफमुळे भारताच्या त्या देशाला होणाऱ्या निर्यातीमध्ये लक्षणीय घट झाल्याचं दिसून येतंय. पण या ताज्या निर्णयामुळे काही प्रमाणात संधी निर्माण झाल्याचं चित्र आहे.

यूएस दर बातम्या: भविष्यात टॅरिफ कमी होण्याचे संकेत

ट्रम्प यांनी लावलेल्या टॅरिफमुळेच अमेरिकेत महागाई वाढत आहे आणि त्याचा फटका सर्वसामान्य अमेरिकन लोकांना बसत असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला. त्यावर ट्रम्प यांनीही प्रतिक्रिया दिली. अमेरिकन नागरिकांवरील भार कमी करण्यासाठी आणि स्थानिक उत्पादनाला चालना देण्यासाठी हा निर्णय आवश्यक होता असं ट्रम्प म्हणाले. तसेच भविष्यातही काही वस्तुंवरील टॅरिफ कमी केले जाऊ शकतात असेही संकेत त्यांनी दिले.

ही बातमी वाचा:

आणखी वाचा

Comments are closed.