इराणसोबतच्या चर्चेबाबत डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान; म्हणाले, शुक्रवारी शांतता वार्ता होऊ शकते सुरू

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

अमेरिका आणि इराण यांच्यातील संबंध ताणलेले असतानाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक सकारात्मक संकेत दिले आहेत. दोन्ही देशांमध्ये चर्चेबाबत गुड न्यूज असून शुक्रवारी शांतता वार्ता होण्याची शक्यता असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. ‘एबीपी न्यूज’ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

वृत्तानुसार, डोनाल्ड ट्रम्प यांनी न्यू यॉर्क पोस्टशी बोलताना ही महत्त्वाची माहिती दिली. त्यांनी इराणसोबतचा युद्धविराम वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रम्प म्हणाले की, येत्या ३६ ते ७२ तासांत ही चर्चा सुरू होऊ शकते. विशेष म्हणजे, ट्रम्प यांनी या रणनीतीचे श्रेय पाकिस्तान आणि त्यांच्या जवळच्या सल्लागारांना दिले आहे. जे या संकटकाळात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत आहेत.

दरम्यान, एकीकडे अमेरिका चर्चेबाबत आशावादी असताना इराणने मात्र हे दावे पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सशी संबंधित ‘तसनीम न्यूज’ने सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले आहे की, “राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा युद्धविराम वाढवल्याचा दावा खोटा आहे.” तसेच शुक्रवारी कोणत्याही प्रकारच्या चर्चेची सध्या कोणतीही योजना नसल्याचे इराणने स्पष्ट केले आहे.

Comments are closed.