होर्मुझ सामुद्रधुनीत सुरुंग पेरणारी इराणी बोट दिसताच गोळ्या घाला! ट्रम्प यांचे अमेरिकी नौदलाला आदेश

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

इराणसोबतच्या युद्धविरामाची मुदत वाढवल्यानंतरही अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कुरापती सुरूच आहेत. ‘होर्मुझच्या सामुद्रधुनीत सुरुंग पेरताना कोणतीही इराणी बोट दिसल्यास दिसताक्षणी गोळ्या घाला,’ असे आदेश ट्रम्प यांनी आज अमेरिकी नौदलाला दिले. होर्मुझच्या मार्गातील स्फोटके हटवण्याचे काम अमेरिकी लष्कर अधिक वेगाने करेल, असेही त्यांनी आज स्पष्ट केले.

होर्मुझचा ताबा सोडणार नाही असा पवित्रा इराणने सुरुवातीपासूनच घेतला आहे. त्याच जोरावर इराणने अमेरिकेला जेरीस आणले आहे. इराणने शस्त्र बनवलेल्या होर्मुझची धार बोथट करण्याचा अमेरिकेचा प्रयत्न आहे. सध्या होर्मुझ बंद असल्याने जगभरात तेल आणि नैसर्गिक वायूचा तुटवडा भासत आहे. हा मार्ग इंधन वाहतुकीसाठी खुला करण्याचा अमेरिकेचा प्रयत्न आहे. तो झाल्यास जगभरातून अमेरिकेवर येणारा दबाव कमी होणार आहे.

Comments are closed.