…तर इराणचे अस्तित्व जगाच्या नकाशावरून मिटवून टाकू; चीनमध्ये पाऊल ठेवताच डोनाल्ड ट्रम्प यांची उघड धमकी
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला पुन्हा एकदा उघड धमकी दिली आहे. इराणने अमेरिकेच्या भूमीवर ‘डर्टी बॉम्ब’ टाकण्याची धमकी प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न केल्यास इराणचे अस्तित्व जगाच्या नकाशावरून मिटवून टाकू, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. चीनमधील शेनझेन येथे आशिया-पॅसिफिक आर्थिक सहकार्य शिखर परिषदेसाठी गेले असताना बुधवारी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते. वॉशिंग्टन डीसीमधील नागरिकांनी इराणकडून डर्टी बॉम्ब हल्ल्याची चिंता करावी का, असे विचारले असता ट्रम्प यांनी, “मला तसे वाटत नाही. मात्र, असा हल्ला झालाच तर आम्ही इराणला पूर्णपणे नष्ट करू,” असा इशारा दिला.
Comments are closed.