जागतिक पॉवरलिफ्टिंगमध्ये प्रतिभा लोणेला कांस्य

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

जिद्द, जिगर आणि अफाट ताकद यांचा त्रिवेणी संगम म्हणजे ठाण्याची प्रतिभा लोणे. इस्तंबूलमध्ये झालेल्या जागतिक पॉवरलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धेत तिने स्क्वॅट प्रकारात तब्बल 242.5 किलो वजन उचलत कांस्यपदकाला गवसणी घातली, तर महिलांच्या खुल्या 84 किलो वजनी गटात एकूण 532.5 किलो वजन उचलून जगात आठवा क्रमांक पटकावला.

तुकाaतील इस्तंबूल येथे नुकत्याच झालेल्या वर्ल्ड ओपन इक्विप्ड पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप मध्ये प्रतिभाने बेंच प्रेसमध्ये 100 किलो, तर डेडलिफ्टमध्ये 190 किलो वजन उचलले. कल्याण तालुक्यातील खडवलीची रहिवासी असलेल्या प्रतिभाने स्वतःच्या जिद्दीवर खर्चिक खेळात जागतिक स्तरावर मजल मारली आहे. अखिल हिंदुस्थानी आंतरविद्यापीठ आणि वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदके जिंकणाऱ्या प्रतिभाला प्रशिक्षक अनंत चाळके यांचे मार्गदर्शन लाभले आहे आता तिची नजर मंगोलियातील उलानबतार येथे 1 ते 10 डिसेंबरदरम्यान होणाऱया आशियाई अजिंक्यपद स्पर्धेवर आहे. जागतिक व्यासपीठावर ताकद दाखवणारी ही महाराष्ट्रकन्या आता आशियातही पदकांची लयलूट करण्यासाठी सज्ज झाली आहे.

Comments are closed.