Hong Kong Open 2026 badminton – श्रीकांत, रक्षिताचा दिग्गजांना धक्का!
हाँगकाँग खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत हिंदुस्थानच्या किदम्बी श्रीकांत आणि 19 वर्षीय रक्षिता रामराज यांनी आपल्यापेक्षा वरच्या क्रमांकावरील प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करीत आगेकूच केली. लक्ष्य सेननेही संघर्षपूर्ण विजय मिळवत अंतिम सोळामध्ये प्रवेश केला.
किदम्बी श्रीकांतने जपानच्या 15 व्या क्रमांकावरील कोकी वातानाबेचा 21-16, 16-21, 21-9 असा पराभव केला. लक्ष्य सेननेही फ्रान्सच्या अर्नाड मर्वैलला 14-21, 21-16, 25-23 असे नमवले. महिला एकेरीत 47 व्या क्रमांकावरील रक्षिता रामराजने जागतिक क्रमवारीत 20 व्या स्थानावर असलेल्या डेन्मार्कच्या मिया ब्लिचफेल्टला 21-18, 21-18 असे पराभूत केले.
कॉमनवेल्थ कबड्डी चॅम्पियनशिपमध्ये हिंदुस्थानने सुवर्णपदक पटकावले होते. या संघातील मध्य रेल्वे मुंबईची महिला खेळाडू सुमनने महिला कबड्डी संघाच्या कोच पुष्पा डावरे यांचा मुंबईत हरियाणा पद्धतीने विशेष सन्मान केला. कॉमनवेल्थ स्पर्धेमध्ये हिंदुस्थानने युगांडाला 20 गुणांनी पराभूत करत सुवर्णपदक पटकावले होते. हिंदुस्थानच्या या संघात मुंबई मध्य रेल्वेच्या सुमन हिने सांघिक कामगिरी चांगली केली होती. हिंदुस्थानच्या महिला कबड्डी संघात खेळूनही मध्य रेल्वे महिला कबड्डी संघाच्या कोच पुष्पा डावरे यांना सुमन विसरली नाही.
Comments are closed.