डोनाल्ड ट्रम्प यांच्या चार वर्षांच्या व्हिसा नियमांना स्थगिती, हिंदुस्थानी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
अमेरिकेत शिक्षण घेणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आंतरराष्ट्रीय विद्यार्थी आणि एक्सचेंज व्हिजिटर्सच्या अमेरिकेतील वास्तव्याजी मुदत चार वर्षांपर्यंत ठेवण्याच्या डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाच्या प्रस्तावाला अमेरिकन कोर्टाने स्थगिती दिली आहे. फेडरल न्यायाधीशांच्या या निर्णयामुळे हिंदुस्थानी विद्यार्थ्यांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.
बोस्टनच्या यूएस डिस्ट्रिक्ट कोर्टाचे न्यायाधीश एफ. डेनिस सेलर यांनी होमलँड सिक्युरिटी विभागाला हा नियम लागू करण्यापासून रोखले आहे. हा नियम अमलात येण्याच्या एक दिवस आधी कोर्टाने हा स्थगिती आदेश जारी केला आहे. प्रस्तावित नियमानुसार, एफ-1 विद्यार्थी आणि जे-1 एक्सचेंज व्हिजिटर्ससाठी चार वर्षांची सामान्य मर्यादा निश्चित केली जाणार होती. तर परदेशी पत्रकारांच्या वास्तव्याची मुदतही बहुतांश प्रकरणांमध्ये 240 दिवसांपर्यंत मर्यादित ठेवण्याचा प्रस्ताव होता.
Comments are closed.