धंगेकरांना गप बसवू नका, चंद्रकांत पाटील, मुरलीधर मोहोळ तुम्ही उत्तर द्या… ; धंगेकरांना पाठिंबा
पुणे: शिवसेना नेते रवींद्र धंगेकरांना (Ravindra Dhangekar) पाठिंबा द्यायला पुण्यात काँग्रेसच (Congress) धावून आल्याचं दिसत आहे. पुण्यातील काँग्रेसचे शहर अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी निलेश घायवळ (Nilesh Ghaywal) प्रकरणात धंगेकरांच्या भूमिकेला थेट पाठिंबा दिला आहे. महायुतीतील लोकांना बोलून धंगेकर (Ravindra Dhangekar) अत्यंत चांगले लढत आहेत. काँग्रेसमध्ये असताना त्यांना कोणी काहीही बोललं नाही त्यांना अडवलं नाही. मात्र त्यांना आता दंगा नको म्हणून सांगण्यात येत आहे. त्यामुळे त्यांची काही प्रमाणात महायुतीत गोची होतं असल्याचं दिसून येत आहे. धंगेकर हे पुणेकरांबाबत प्रश्न विचारात आहेत. त्यामुळे चंद्रकांत पाटील आणि मुरलीधर मोहोळ यांनी याल उत्तर द्यायला हावं, अस स्पष्ट मत अरविंद शिंदे यांनी व्यक्त केलं आहे.(Ravindra Dhangekar)
पुण्यातील कोथरूड परिसरातील गुंड निलेश घायवळ प्रकरणात रविंद्र धंगेकरांनी मंत्री चंद्रकांत पाटलांना काही प्रश्न विचारले होते, त्याचबरोबर मंत्री पाटील यांच्या जवळचा एक व्यक्ती घायवळच्या संपर्कात असून तो घायवळ आणि चंद्रकांत पाटील यांच्यात चर्चा घडवून आणत असल्याचं सांगितलं आहे. रवींद्र धंगेकर यांनी पत्रकार परिषदेत निलेश घायवळ आणि समीर पाटील यांचे चंद्रकांत पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांसोबतचे अनेक फोटो दाखवले होते. या फोटोच्या आधारावर रवींद्र धंगेकर यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
Ravindra Dhangekar: काय म्हणाले होते धंगेकर?
निलेश घायवळ ज्या पद्धतीने दादागिरी करतोय, खोटा पासपोर्ट तयार केला गेला. निलेश घायवळ किंवा समीर पाटील असेल ही सर्व लोक चंद्रकांत पाटील यांच्या आसपास असतात. यामुळेच त्यांचे धाडस होत चालले आहे, असं रवींद्र धंगेकर यांनी म्हटलं होतं, समीर पाटील ज्यावेळेस पोलीस स्टेशनमध्ये जातो, त्यावेळेस चंद्रकांत पाटील यांच्या जवळचा असल्यामुळे तो पोलिसांवर दबाव टाकतो. धंगेकरांनी समीर पाटील यांच्यावर मोक्का, फसवणूक (चीटिंग) अशा प्रकारचे गुन्हे दाखल असल्याची माहिती दिली होती.
यावेळी रवींद्र धंगेकरांनी कोथरूडमधील गुन्हेगारीच्या वाढत्या घटनांवरून चंद्रकांत पाटलांना आव्हान दिले. कोथरूडमध्ये ज्या पद्धतीने गुन्हेगारी चालते, रोज मुडदे पडतात, रिव्हॉल्व्हर निघतायेत. तुम्ही तिथले लोकप्रतिनिधी आहात. त्यामुळे आम्ही तुम्हाला विचारतोय, तुम्ही म्हणा एकदा की आम्ही त्यांचा खात्मा करू. गौतमी पाटीलवर ॲक्शन घेणाऱ्या चंद्रकांत पाटलांनी या गुंडांना उचला असे का म्हणत नाही? चंद्रकांत पाटील तुम्ही त्यांना घाबरत आहात का?, असा सवाल धंगेकर यांनी केला.
आणखी वाचा
Comments are closed.