डॉ. गौरी पालवेंच्या वडिलांचं वरळी पोलिसांना पत्र; दीर अन् नणंदेच्या अटकेची मागणी, बिल्डींगमधील
मुंबई: भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांचे पीए (Pankaja Munde) अनंत गर्जे (Anant Garje) यांना वरळी रविवारी मध्यरात्री पोलिसांनी अटक केली आहे. अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉ. गौरी पालवे (Dr Gauri Palve Death case) यांनी शनिवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉक्टर गौरी पालवे-गर्जे यांनी त्यांच्या राहत्या घरात मृत अवस्थेत आढळून आल्या. गौरी यांनी आत्महत्या (Dr Gauri Palve Death case) केल्याचे सांगितले जात आहे. मात्र दुसरीकडे त्यांच्या आई-वडिलांनी मात्र यामध्ये घातपाताचा संशय व्यक्त केला आहे, त्याचबरोबर त्यांनी अनंत गर्जे आणि त्यांच्या कुटुंबीयांवर गंभीर आरोप केले आहेत. आता गौरीच्या हत्येच्या आरोपात ननंद आणि दीराला अटक करा अशी मागणी गौरी पालवेंच्या वडीलांनी केली आहे, त्यांनी त्याबाबत वरळी पोलिसांना पत्र देखील दिले आहे. (Dr Gauri Palve Death case)
गौरी पालवेंच्या आत्महत्या प्रकरणात फक्त अनंत गर्जेला अटक झाली आहे. गौरी पालवे आत्महत्या प्रकरणात दीर अजय गर्जे आणि ननंद शितल आंधळे मोकाट फिरत आहेत. असा उल्लेख गौरी पालवेंच्या वडीलांनी वरळी पोलिसांना लिहीलेल्या पत्रात केला आहे, अनंत आणि गौरी राहत होते त्या बिल्डींगचा CCTV देण्याचीही मागणी गौरी पालवेंच्या वडीलांनी केली आहे. (Dr Gauri Palve Death case)
Anant Garje & Gauri Palve: पत्रात काय म्हटलंय?
वरील विषयास अनुसरून मी अशोक पालवे आपणास खालील बाबी संदर्भात विनंती करतो. मी आरोपी म्हणून अनंत गर्जे, अजय गर्जे शितल आंधळे या तीन नावांचा आरोप पत्रात उल्लेख केला होता. परंतु सध्या फक्त अनंत यास अटक झाली असून इतर दोन आरोपी मोकाट फिरत आहेत त्यांना लवकरात लवकर अटक व्हावी. अनंत व गौरी यांच्या त्यांच्या राहत्या घराच्या बिल्डिंगमधील हत्येच्या दिवशीचा पूर्ण दिवसाचा लिफ्ट, जिना, मुख्य एंट्रन्स, यातली सीसीटीव्ही फुटेज मिळावे हे आपणास नम्र विनंती
Anant Garje & Gauri Palve: २२ नोव्हेंबरला गौरी पालवेंनी टोकाचं पाऊल संपवलं आयुष्य
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी २२ नोव्हेंबरच्या रात्री अनंत गर्जे यांच्या पत्नीने आत्महत्या केली. 10 महिन्यापूर्वीच त्यांचं लग्न झालं होतं. दरम्यान, पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. अनंत गर्जे यांचे लग्न फेब्रुवारी महिन्यात झाल्याची माहिती आहे. या लग्नाला स्वतः पंकजा मुंडे या देखील उपस्थित होते. मात्र, लग्नाच्या अवघ्या दहा महिन्यांत अनंत गर्जेंच्या पत्नीने टोकाचे पाऊल उचलले. या घटनेनं हळहळ व्यक्त होत आहे.
Anant Garje & Gauri Palve: गर्जेंच्या प्रेमसंबंधांविषयी गौरीच्या कुटुंबीयांना अगोदरच माहिती होतं
मंत्री पंकजा मुंडे यांचा पीए अनंत गर्जेच्या प्रेमसंबंधाबाबत लग्नापूर्वीच डॉ. गौरी पालवेच्या कुटुंबीयांना सांगण्यात आले होते, असा दावा त्याच्या वकिलाने पोलिस कोठडीला विरोध करताना न्यायालयात केला आहे. अशोक पालवे यांनी जबाबात उल्लेख केलेली मूळ कागदपत्रे लातूर येथील रुग्णालयात आहेत. ती ताब्यात घेऊन गौरी पालवेंचे वडील अशोक पालवे यांनी केलेल्या आरोपांची शहानिशा करावी लागेल. अनंत गर्जेसह त्याच्या भावंडांवर देखील आरोप आहेत. त्यांचाही शोध सुरू असून त्यांची चौकशी करणे बाकी असल्याचे सांगत सरकारी वकिलांनी गर्जेच्या कोठडीची मागणी केली.
अनंत गर्जेचे वकील अॅड. मंगेश देशमुख यांनी कोठडीला विरोध करत, दाखल गुन्ह्यातून डॉ. गौरी यांना आरोपीने आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे स्पष्ट होत नसल्याचे म्हटले. घटना घडली तेव्हा डॉ. गौरी घरी एकट्याच होत्या. त्यांनी घर आतून बंद केले होते. शिवाय प्रेमसंबंधांबाबत आरोपीने लग्नापूर्वीच डॉ. गौरी यांच्या कुटुंबीयांना कल्पना दिली, असा युक्तिवाद केला. मात्र, न्यायालयाने गर्जेला २७पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
आणखी वाचा
Comments are closed.