डॉ. संग्राम पाटील यांची उच्च न्यायालयाकडे कळकळीची विनंती; म्हणाले, युकेस्थित नोकरी धोक्यात…
डॉ संग्राम पाटील प्रकरण मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सोशल मीडियाच्या माध्यमातून आक्षेपार्ह टीका केल्याचा ठपका ठेवत भारतीय वंशाचे ब्रिटिश नागरिक डॉ. संग्राम पाटील (Dr. Sangram Patil) यांni उच्च न्यायालयाकडे एक कळकळीची विनंती केली आहे. युकेस्थित आपली नोकरी धोक्यात आली आहे. त्यामुळे आपल्या याचिकेवर तातडीने सुनावणी घ्यावी, अशी विनंती भारत सोडण्यास मज्जाव करण्यात आलेले डॉ. संग्राम पाटील यांनी न्यायालयाकडे केली. या विनंतीवरून आता 17 फेब्रुवारी रोजी सुनावणी घेण्याचा प्रयत्न केला जाईल, असे न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
Dr. Sangram Patil : युकेस्थित आपली नोकरी धोक्यात, याचिकेवर तातडीने सुनावणी घ्यावी
युकेस्थित डॉक्टर आणि यूट्यूबर असलेले पाटील हे पर्यटक व्हिसावर भारत दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी भारतात येण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपबद्दल काही आक्षेपार्ह मजकूर समाजमाध्यमावर प्रसिद्ध केला होता. त्यानंतर त्यांना भारत सोडून जाण्यास मज्जाव करण्यात आला. तसेच, त्यांच्यावर गुन्हाही दाखल केला गेला. याविरुद्ध पाटील यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. उच्च न्यायालयाच्या एकलपीठापुढे त्यांची याचिका सुनावणीसाठी आली. त्यावेळी, भारत सोडून जाण्यास मज्जाव करण्यात आल्याने युकेस्थित आपली नोकरी धोक्यात आली आहे, असे पाटील यांच्या वतीने न्यायालयाला सांगण्यात आले. तसेच, त्यांच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी करण्यात आली.
दरम्यानवेळेअभावी पाटील यांची याचिका सुनावणीसाठी येऊ शकली नाही. परंतु, या प्रकरणी 17 फेब्रुवारी रोजी सुनावणी घेण्याचा प्रयत्न करू सुनावणीसाठी आली. त्यावेळी, भारत सोडून जाण्यास मज्जाव करण्यात आल्याने युकेस्थित आपली नोकरी धोक्यात आली आहे, असे पाटील यांच्या वतीने न्यायालयाला सांगण्यात आले. तसेच, त्यांच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी करण्यात आली.
Dr. Sangram Patil Case : देश सोडून जाण्यास मज्जाव, नेमकं प्रकरण काय?
डॉ. संग्राम पाटील हे त्यांच्या पत्नीसोबत काही दिवसांपूर्वी लंडनवरुन मुंबई विमानतळावर पोहोचले. ते विमानतळावर येतात मुंबई पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. 14 डिसेंबर 2025 रोजी ‘शहर विकास आघाडी’ या नावाने असलेल्या सोशल मीडिया अकाउंटवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात एक मजकूर प्रसिद्ध झाला. त्यावर भाजपच्या सोशल मीडिया संयोजकांनी तक्रार दाखल केली. याच तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी संग्राम पाटील यांची चौकशी केल्याची माहिती आहे. मुंबई सायबर पोलिस ठाण्यातील आणखी एका प्रकरणातही संग्राम पाटील यांची चौकशी करण्यात आली आणि नंतर त्यांना सोडण्यात आल्याची माहिती आहे. संग्राम पाटील हे केवळ ब्रिटनचे नागरिक असल्याने त्यांना अटक करण्यात आली नसल्याचं मत अॅड. असीम सरोदे यांनी मांडलं. दरम्यानपाटील यांच्याविरोधात एन. एम. जोशी मार्ग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर, पाटील यांना देश सोडून जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
आणखी वाचा
Comments are closed.