सोनम रघुवंशीच्या जामीन अर्जावर सुनावणी पुढे ढकलली.
नवी दिल्ली: इंदोर मधील व्यावसायिक राजा रघुवंशी यांच्या हत्या प्रकरणी पत्नी सोनम रघुवंशीच्या जामीन याचिकेवर मंगळवारी सुनावणी होऊ शकली नाही. आता याप्रकरणी 21 जुलै रोजी सुनावणी होणार आहे. या सुनावणीत मेघालय सरकार सोनमच्या अटकेवेळी उपलब्ध करविण्यात आलेल्या तथ्यांना न्यायालयात सादर करणार आहे. मेघालय सरकारकडून सुनावणीत सोनमचा जामीन रद्द करण्याची मागणी करण्यात येणार आहे. तर सोनमचे वकीलही सर्वोच्च न्यायालयासमोर युक्तिवाद करणार आहेत. अटक करताना कारवाईचा आधार उपलब्ध करविण्यात आला नव्हता या युक्तिवादाला मान्य करत कनिष्ठ न्यायालयाने सोनमला जामीन मंजूर केला होता. नंतर मेघालय उच्च न्यायालयाने देखील जामीन मंजूर करण्याचा निर्णय योग्य ठरविला होता. तर याच्या विरोधात दाखल याचिकेच्या सुनावणीवेळी राज्य सरकारच्या वकिलाने केवळ एक टायपिंग मिस्टेकचा वाद असल्याचा दावा केला होता. दस्तऐवजात हत्येशी संबंधि भारतीय न्याय संहितेचे कलम 103 (1) च्या जागी चुकून कलम 403(1) असा उल्लेख झाला होता.
Comments are closed.