रश्मी देसाई या शो मधून करणार कमबॅक; तर नव्या प्रोमोतील बालकलाकार ठरतीय चर्चेचा विषय – Tezzbuzz
रश्मी देसाई हि एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. ती अनेक मालिका शो मधुन प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे, मात्र ती काही वर्षापासुन छोट्या पडद्यावर दिसत नाहीये. तिने त्या वेळी ‘परी हूँ मैं’, ‘उतरन’ आणि ‘दिल से दिल तक’ सारखे हिट शो दिले आहेत, तसेच ‘बिग बॉस 13’ आणि ‘झलक दिखला जा 5’ मध्ये ती दिसली होती आणि त्याच्या यातील अभिनयामुळे ती आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. मात्र ती दिवसांपासुन दिसत नसल्याने तिचे चाहते तीला मिस करत आहेत. तर या चाहत्यासाठी आता एक आंनदाची बातमी आहे. ही अभिनेत्री एका नवीन शोद्वारे टीव्हीवर परत येत आहे. ‘सायोनी’ नावाच्या या नवीन शोचा प्रोमो आधीच प्रदर्शित झाला आहे.
रश्मी देसाई स्टार प्लसच्या सायोनी या मालिकेत दिसणार आहे, या मालिकेचा नुकताच प्रोमो रिलीज करण्यात आला आहे. या प्रोमो मध्ये असे दिसुन येते की, रश्मी आपल्या मुलापासुन वेगळी झाल्याच्या भुमिका करणार आहे. तर या प्रोमोची सुरुवात सान्वी नावाच्या एका खेळकर मुलीने करण्यात आली आहे. जी अनाथ आश्रमात वाढली होती. पण तीला जाणीव नाही की, ती कुठे राहत आहे. लहानपणापासून सान्वी आपल्या आईसाठी देवाला प्रार्थना करत आहे. मग, रश्मी देसाई प्रोमोमध्ये प्रवेश करते. निर्मात्यांनी ‘आई असूनही ती अनाथ आहे.., मग याचे जग हे एक होईल का? अश्या प्रकारचा हा सस्पेस भासवणारा प्रोमो आहे.
या आगामी शोमध्ये रश्मी देसाई आणि जान्हवी सोनी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. परंतु शोच्या सुरुवातीला दिसलेल्या बालकलाकाराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. आणि तीला पाहुन बजरंगी भाईजान मधील मुन्नी ची आठवण झाली आहे.
हेही वाचा
या विनोदवीराला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दणका, खोटी विधाने केल्याप्रकरणी 3 लाखांचा दंड जाहीर
Comments are closed.