जपानमध्ये भूकंपाचे हादरे; 7.4 रिश्टर स्केलचा धक्का
उत्तर जपानमध्ये आज सकाळी 7.4 रिश्टर स्केलचे तीव्र भूकंपाचे हादरे बसले. या धक्क्याची तीव्रता इतकी होती की टोकियोमधील अनेक इमारतींना हादरे जाणवले. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. अनेक किलोमीटर लांबपर्यंत या भूपंपाचा प्रभाव पाहायला मिळाला. भूकंपाचे हादरे जाणवल्यानंतर अंदाजे 40 मिनिटांनंतर समुद्रात 31 इंच उंच लाटा उसळल्या आणि त्या इवाटे येथील कुजी बंदरावर धडकल्या. जपान हवामान विभागाने या भूकंपाची माहिती प्रसिद्ध केली असून त्सुनामीचा इशारा दिला आहे.
त्सुनामीमुळे समुद्रात तीन मीटर (10 फूट) उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता वर्तवली असून नागरिकांना किनारपट्टीपासून लांब जाण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. त्सुनामीचा जोर वाढण्याची भीती हवामान खात्याने वर्तवली आहे. प्रशासनाने बचाव पथकांना सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. ज्या भागात अधिक नुकसान होण्याची भीती आहे? अशा ठिकाणच्या नागरिकांनी सतर्क राहावे. किनारपट्टी आणि नदीजवळील नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे. जमिनीवरुन उंच असणाया आणि बचावकार्य करण्यास सोपे असणाऱ्या ठिकाणी नागरिकांनी आश्रय घेण्याचे आवाहनही प्रशासनाने केले आहे.
2011 साली जपानमध्ये 9.0 रिश्टर स्केलचा भूपंप झाला होता यामुळे निर्माण झालेल्या त्सुनामीच्या लाटांमुळे 18 हजार 500 नागरिकांचा मृत्यू झाला होता. याशिवाय फुकुशिमा आण्विक पेंद्राजवळ मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले होते. दरम्यान, आता जाणवलेल्या भूकंपाच्या धक्क्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
Comments are closed.