लग्नाचं आश्वासन देऊन ऑफिस, लॉजवर महिलेशी बळजबरी शारीरिक संबंध ठेवले, भाजप नगरसेवकाविरुद्ध गुन्ह
मिरा-भाईंदर : मिरा-भाईंदर परिसरात एका महिलेने केलेल्या गंभीर आरोपांमुळे खळबळ उडाली असून भाजपाचे नगरसेवक लक्ष्मण जंगम यांच्याविरुद्ध अखेर गुन्हा (Mira Bhayandar Crime News)दाखल करण्यात आला आहे. सुरुवातीला पोलिसांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र, एबीपी माझाने बातमी प्रसारित केल्यानंतर मिरा रोड पोलिसांनी तत्काळ दखल घेत संबंधित गुन्हा नोंदवला. (Mira Bhayandar Crime News)पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 69 आणि 351(2) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हे कलम फसवणूक करून शारीरिक संबंध ठेवणे तसेच धमकी देणे या प्रकारांशी संबंधित आहे. (Mira Bhayandar Crime News)
Mira Bhayandar Crime News: लग्नाचे आश्वासन देत तिच्यावर…
पीडित महिलेच्या तक्रारीनुसार, जुलै 2022 मध्ये आरोपीने तिला मिरारोड पूर्व येथील आपल्या कार्यालयात बोलावले. तेथे लग्नाचे आश्वासन देत तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. महिलेने विरोध केला असतानाही विविध ठिकाणी कार्यालय, लॉज तसेच इतर ठिकाणी तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. (Mira Bhayandar Crime News)
Mira Bhayandar Crime News: तक्रार केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी
तसेच, तक्रार केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी देण्यात आल्याचाही उल्लेख महिलेने केला आहे. या सर्व प्रकारामुळे पीडित महिला मानसिकदृष्ट्या त्रस्त झाल्याचेही समोर आले आहे. दरम्यान, सुरुवातीला पोलिसांनी तक्रार नोंदवून घेण्यास विलंब केल्यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. एबीपी माझाने हा मुद्दा उचलून धरल्यानंतर पोलिस यंत्रणा हलली आणि अखेर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून आरोपी नगरसेवकावर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. पुढील तपास मिरा रोड पोलिसांकडून सुरू आहे.
दरम्यान, या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर राजकीय वर्तुळातही जोरदार प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. विरोधकांनी या घटनेवरून सत्ताधारी पक्षावर टीका करत संबंधित नगरसेवकावर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच, महिलांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून प्रशासनाची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोपही करण्यात येत आहे. या घटनेमुळे मिरा-भाईंदर परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
पोलिसांकडून सध्या पीडित महिलेचे सविस्तर जबाब नोंदवले जात असून, आरोपीविरोधातील पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. संबंधित ठिकाणांवरील सीसीटीव्ही फुटेज, कॉल रेकॉर्ड आणि इतर तांत्रिक बाबींची तपासणी केली जात आहे. प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली तपास सुरू असून, लवकरच पुढील कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आणखी वाचा
Comments are closed.