धोका वाढला! इबोलामुळे जगभरात 223 मृत्यू

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

आफ्रिकेतील डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो आणि युगांडामध्ये इबोलाने चांगलीच चिंता वाढवली आहे. इबोलाचा आजार हा घामातून पसरत असल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे. धक्कादायक म्हणजे कोरोनापेक्षा अधिक वेगाने हा आजार पसरत आहे. शिवाय इबोला या विषाणूमध्ये मृत्यूचे प्रमाणही अधिक आहे. जगभरात इबोलाची लागण 906 लोकांना झाली असून 223 जणांचा मृत्यू झाला आहे.

हिंदुस्थानात या व्हायरलचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. दिल्लीमध्ये त्याबाबत महत्त्वाची बैठक झाली असून आरोग्य मंत्रालयाने काँगो, युगांडा आणि दक्षिण सुदानमधून येणाऱ्या प्रवाशांसाठी आरोग्यविषयक सूचना जारी केली आहे. विमान कंपन्यांना काही सूचना जारी केल्या आहेत. इबोला प्रतिबंधक लस आणि अँटीबॉडीज विकसित करण्यात भारतीय शास्त्रज्ञ आणि औषध कंपन्या काम करत आहेत.

Comments are closed.