टेरर फंडिंग प्रकरणी जम्मू-काश्मीरमध्ये ईडीचे छापे

श्रीनगर: टेरर फंडिंगशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मंगळवारी जम्मू-काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी छापे टाकले. श्रीनगरमधील किमान चार ठिकाणांची प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग कायद्यांतर्गत झडती घेण्यात आली. ही कारवाई उमर आदिल डार आणि त्याच्या साथीदारांशी संबंधित आहे. ईडीच्या आरोपानुसार, डार प्रतिबंधित लष्कर-ए-तोयबा संघटनेसाठी ओव्हर ग्राउंड वर्कर म्हणून काम करत होता. यापूर्वी डार आणि त्याच्या साथीदारांना मोठ्या प्रमाणात रोख रक्कम व संघटनेशी संबंधित साहित्य मिळाल्याच्या प्रकरणात अटक करण्यात आली होती.

Comments are closed.