अमेरिकेनंतर चीनच्या आठ दिग्गज शास्त्रज्ञांचा संशयास्पद मृत्यू

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

अमेरिकेनंतर चीनमध्येही दिग्गज शास्त्रज्ञांचा संशयास्पद मृत्यू झाल्याचा धक्कादायक  प्रकार उघड झाला आहे. गेल्या दोन वर्षांत चीनच्या संरक्षण आणि हायपरसोनिक क्षेपणास्त्र प्रकल्पाशी संबंधित तब्बल 8 दिग्गज शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या मरण पावले. यातील तिघांचा मृत्यू रस्ते अपघातात झाला असून, इतरांचा मृत्यू अज्ञात आजार किंवा संशयास्पद परिस्थितीत झाला आहे. या मृत्यूंच्या कारणांबाबत चीनने कमालीची गुप्तता पाळली असून, यामागे परकीय गुप्तचर यंत्रणांचा हात तर नाही ना, असा संशय व्यक्त होत आहे.

‘न्यूजवीक’ मासिकाने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, 2023 ते 2025 या कालावधीत चीनच्या हायपरसोनिक मिसाइल, ड्रोन तंत्रज्ञान आणि प्रगत रसायनशास्त्र प्रकल्पांवर काम करणाऱ्या 8 शास्त्रज्ञांचा मृत्यू झाला आहे. स्पेस मॉनिटरिंग प्रोग्रामचे प्रमुख झांग जियाओक्सिन यांचा 2024 मध्ये रस्ते अपघातात मृत्यू झाला. मात्र, अपघाताचे कारण अद्याप समजलेले नाही. फांग डेइंग हे हायपरसोनिक प्रकल्पाचे आधारस्तंभ होते. 2024 मध्ये आफ्रिका दौऱ्यावर असताना दगावले.  याशिवाय ली मिनयोंगा, fिलयू डोनघाओ, झांग दाइबिंग, यान होंग, झोउ गुआनगुआन आदी शास्त्रज्ञांचा मृत्यू झाला.

n गेल्या तीन वर्षांत अमेरिकेच्या परमाणु प्रकल्पाशी संबंधित 10 शास्त्रज्ञांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. व्हाइट हाऊसने या प्रकरणाची गंभीर दखल घेत उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. इतके मोठे शास्त्रज्ञ दगावूनही चीन किंवा अमेरिका यापैकी कोणीही अधिकृतपणे भाष्य करायला तयार नाही.

Comments are closed.