एजाज खान नॉट रिचेबल, मुंबई पोलिसांच्या हाती लागेना, महिलेवरील अत्याचार प्रकरणात गुन्हा दाखल
अजाज खान फरार : बलात्काराच्या प्रकरणातील आरोपी एजाज खान याच्या अडचणी सतत वाढत आहेत. चारकोप पोलीस स्टेशनमध्ये गु्न्हा दाखल केल्यानंतर एजाज खान फरार आहे. अटक टाळण्यासाठी त्यानं सर्वात आधी सत्र न्यायालयात आणि त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला. पण सत्र न्यायालयानं एजाज खानची अटकपूर्व याचिका रद्द केली आहे. तर बॉम्बे हायकोर्ट एजाज खानच्या याचिकेवर 2 जूनला सुनावणी करणार आहे.
एजाज खानवर कोणते आरोप?
तक्रारदार महिला अभिनेत्रीनं एजाज खानवर आरोप केला आहे की, एजाज खाननं तिला लग्नाचं आश्वासन देऊन आणि हाऊस अरेस्ट या रिअॅलिटी शोमध्ये कास्ट करून फसवलंय. त्या महिलेनं दिलेल्या माहितीनुसार, एजाज खाननं तक्रारदार महिलेसमोर हा प्रस्ताव ठेवला होता आणि त्यानंतर एजाज खाननं पीडित महिलासोबत शारीरिक संबंध ठेवले. एजाज खाननं एकदा नाहीतर वारंवार तिला आश्वासनं देऊन तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवल्याचा दावाही महिलेनं केला आहे.
फरार एजाज खानचा पत्ताच लागेना
मुंबईच्या चारकोप पोलीस स्टेशनमध्ये एजाज खानविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनतर पोलिसांनी एजाज खानला पकडण्यासाठी काही पथक तैनात करण्यात आली आहे. पोलीस एजाज खानचा शोध घेत आहेत. पण, एजाज खान पोलिसांच्या हाती काही लागत नाही. पोलिसांनी एजाज खानचं लोकेशन ट्रेस करण्याचाही प्रयत्न केला. पण, एजाज खानचा मोबाईल बंद असल्यामुळे पोलिसांकडून त्याचं लोकेशन ट्रेस होत नाहीय. दरम्यान, पोलिसांकडून याप्रकरणाचा कसून तपास सुरू आहे.
‘हाऊस अरेस्ट’मधून अश्लीलता पसरवण्याचा आरोप
उल्लू अॅपवर स्ट्रीम होणारा शो हाऊस अरेस्टमधून अश्लीलता पसरवली जात असल्याच्या आरोपात अंबोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘शो’ च्या काही क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्या, त्यानंतर शोला विरोध करण्यात आला. या शोचा होस्ट एजाज खान कंटेस्टंटला इंटीमेट पोझिशन करुन दाखवण्याचा टास्क देतो. या क्लिप्स व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आणि शो बंद करण्याच्या मागणीनं जोर धरला. वाद वाढल्यानंतर हाऊस अरेस्ट शोचे सर्व एपिसोड उल्लू ओटीटी अॅपवरून हटवण्यात आले.
अधिक पाहा..
Comments are closed.