एकनाथ खडसेंवर मुलाच्या हत्येचे आरोप; निखील खडसेंनी स्वत:वर गोळी झाडली तेव्हा काय घडलं? रोहिणी ख

पुणे: राज्याच्या राजकारणातील बडे नेते, माजी मंत्री असलेले एकनाथ खडसे यांच्यावरती सातत्याने त्यांच्या मुलाच्या म्हणजेच निखिल खडसेंच्या हत्येचे आरोप होत असतात. पण वडिलांवरच मुलाला संपवल्याचे का आरोप का होतात. निखील खडसेंसोबत त्या दिवशी काय घडलं होतं? याबाबतचे खुलासे राष्ट्रवादी काँग्रेस शरददचंद्र पवार पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसेंनी एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत केले आहेत.

निखिल दादा बेडवरती पडला होता, रक्त वाहत होतं….

निखील खडसेंच्या मृत्यूच्या दिवसाबाबत सांगताना रोहिणी खडसे म्हणाल्या, तो जेव्हा गेला तेव्हा असं वाटलं नव्हतं की तो असा काही निर्णय घेईल. त्याने दिवसभर सर्व लग्न अटेंड केली. 1 मे 2013 या दिवशी लग्नाची तिथी प्रचंड मोठी होती. त्याने अनेक लग्न अटेंड केले आणि तो घरी आला. घरी आल्यानंतर त्याने आई आणि रक्षा वहिनी यांच्याबरोबर हॉलमध्ये चहा घेतला. नंतर तो बेडरूम मध्ये गेला. नंतर रक्षा वहिनी आणि तो दोघेच रूममध्ये होते. यांच्यामध्ये काय चर्चा झाली, काय नाही, ते मला माहिती नाही किंवा तिथे कोणी नव्हतं. रक्षा वहिनी बाहेर पडल्या त्या किचनकडे जात असतानाच त्यांना आणि माझ्या आईला कोणीतरी बंदुकीच्या गोळी झाडल्याचा आवाज आला. त्या रूममध्ये गेल्या जेव्हा त्यांनी ते बघितलं तेव्हा निखिल दादा बेडवरती पडला होता, रक्त वाहत होतं. त्या दोघींनी तात्काळ आमच्या  गावचे सरपंच नारायण चौधरी आणि बाकी सर्वांना मदतीसाठी फोन केला. कारण त्यावेळी बाबा घरी नव्हते किंवा परिवारातला दुसरा कोणीच घरी नव्हतं. मी पुण्याला होते. माझी एलएलएमची फायनलची परीक्षा होती आणि बाबा मुक्ताईनगरला लग्नासाठी गेले होते. त्यावेळी गावातले सगळे लोक तिथे आले, त्याला बेडवरून उचलून ॲम्बुलन्सपर्यंत नेलं. त्यावेळी बाबा तिथे बाहेर आले. दादाला ॲम्बुलन्स मध्ये टाकत असताना बाबांनी त्याला पाहिलं. म्हणजे ज्या घटनेसाठी लोकं राजकारण करत आहेत किंवा निखिल दादाच्या नावाचा वापर करत आहेत. ती घटना झाली तेव्हा बाबा घरातच नव्हते. ही घटना घडली तेव्हा संपूर्ण गाव आमच्या घरी पोहोचलं होतं, त्यानंतर बाबा पोहोचले होते, ह्या गोष्टीला लपवण्यासारख्या नसतात हे सर्व गावासमोर झालेलं होतं, असंही पुढे रोहिणी खडसे यांनी म्हटलं आहे.

तेव्हा माझा भाचा अडीच वर्षांचा होता

ही घटना घडली तेव्हा माझा भाचा अडीच वर्षांचा होता. इतका लहान मुलगा असताना आम्ही कोणत्या कठीण परिस्थितीत त्याला मोठं केलं आहे ते  आम्हाला माहिती आहे, आमच्या सर्वांसाठी ते सर्व वेदनादायी आहे, राजकारणाची पातळी प्रचंड खाली गेलेली आहे. तुम्ही आरोप प्रत्यारोप करताना कुठपर्यंत जाणार आहात याला एक मर्यादा हवी असेही पुढे रोहिणी खडसे यांनी म्हटलं आहे.

कदाचित मी त्यावेळी गेले असते तर

ही घटना घडली तेव्हा निखिल खडसे डिप्रेशनमध्ये होते अशी चर्चा होती, त्यांच्या आजारपणामुळे आणि निवडणुकीमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला हे हे त्या नैराश्याचे कारण होतं का? या प्रश्नावर बोलताना रोहिणी खडसे म्हणाल्या, त्याला पाठीचा प्रचंड त्रास होता. मणक्यामध्ये त्याची नस दाबली गेली होती. त्याचं ऑपरेशन करणं आम्हाला शक्य नव्हतं. आम्ही बऱ्याच डॉक्टरांना दाखवलं कारण डॉक्टर म्हणाले होते, ऑपरेशन सक्सेसफुल होऊ शकतं किंवा होऊ पण शकत नाही, त्यामुळे ऑपरेशन करण्याचा पर्याय आमच्याकडे नव्हता, पण त्याची सहनशक्ती संपलेली होती. त्यावेळी त्याची पाठ प्रचंड दुखायची. पेन किलर घेतल्यानंतर बरं वाटायचं पण नंतर परिस्थिती तीच. त्याने हा निर्णय का घेतला ते अजून पर्यंत मलाही कळलं नाही. त्या दिवसाच्या आदल्या रात्री बारा तारखेला आमचा बोलणं झालं होतं. तो मला म्हणाला होता. मला तुझ्या सोबत बोलायचं आहे. तू सगळं सोडून मुक्ताईनगरला ये. माझी 13 मेला परीक्षा होती. मी त्याला म्हटलं की परीक्षा होऊन जाऊ दे मग आपण याच्यावरती बोलूयात. त्याच्या मनामध्ये काय होतं त्याच्यातून ते हे केलं किंवा त्याने हे का केलं त्याच उत्तर त्याच्यासोबतच गेलं. तो आयुष्य जगत असताना पूर्णपणे जगायचा. आयुष्य जगायचं त्याला चांगलं कळत होतं. तो ढासळून जाणाऱ्यातला नव्हता. क्षण असा असतो त्या क्षणी जर आपण कुमकवत पडलो तो क्षण आपल्याला तिथपर्यंत घेऊन जातो आणि कदाचित तो क्षण त्याला आवरता आला नाही. मलाही आत्ता वाटतं की कदाचित मी त्यावेळी गेले असते तर मला ते कारण कळू शकलं असतं  आणि हे सगळं थांबलं असतं, असंही पुढे रोहिणी खडसे म्हणाल्या.

सुसाईड नोट बद्दल बोलताना रोहिणी कसे म्हणाल्या, हे त्याने ठरवून केलेले नव्हतं. तो एक क्षण आला आणि त्याने त्या क्षणात निर्णय घेतला. तो का घेतला हे सांगायला तिथे कोणीच नव्हतं. कारण त्यावेळी रूममध्ये तो एकटाच होता, ज्यावेळी त्यांनी शूट करून घेतलं. आजूबाजूला कोणी नव्हतं आणि घरातही कोणी नव्हतं. कारण आई किचनमध्ये होते आणि रक्षा वहिनी त्याच्या रूममधून नुकतीच बाहेर पडली होती, त्याने हे का केलं हे सांगायला तर काय पर्याय नाही, असंही त्या पुढे म्हणाल्या.

आणखी वाचा

Comments are closed.