महाराष्ट्रात राहून चेकाळल्याचा अर्थ कळत नसल्यास यांच्या बुद्धीची किव केली पाहिजे; खडसेंचा खोचक
Eknath Khadse on Rupali Chakankar : काही दिवसांपूर्वी पुण्यातील खराडी येथे सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर पोलिसांनी छापा टाकाला होता, या प्रकरणात माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचे जावई प्रांजल खेवलकर (Pranjal Khewalkar) यांना अटक करण्यात आलं आहे, ते सध्या जेलमध्ये आहेत. या प्रकरणात आता महिला आयोगाची एन्ट्री झाली आहे, या प्रकरणावर बोलताना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी पत्रकार परिषद घेत एकनाथ खडसे यांच्या जावयावर गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. खेवलकरांच्या मोबाईलमध्ये महिलांचे आक्षेपार्ह फोटो आहेत, असा आरोप चाकणकर यांनी केला. चाकणकर यांच्या आरोपानंतर एकनाथ खडसे यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. रुपाली चाकणकर या चेकाळल्या आहेत, असे त्यांनी म्हटले. यानंतर महायुतीकडून एकनाथ खडसे यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. आता एकनाथ खडसे यांनी आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले आहे.
रूपाली चाकणकर या माझ्या मुलीसारख्या : एकनाथ खडसे
चेकाळणे या शब्दाचा अर्थ गुगलवर जाऊन एकदा पाहा. या भाजपवाल्यांना महाराष्ट्रात राहून मराठीचा अर्थ समजत नसेल तर यांच्या बुद्धीची कीव येते. रूपाली चाकणकर या माझ्या मुलीसारख्या आहेत. त्या माझ्या घरी जेवण करून गेलेल्या आहेत. चेकाळणे शब्दाचा अर्थ आवेशाने, खवळणे असे अनेक अर्थ होतात. एकदा गुगलवर जाऊन तपासा. ज्यांना मी दूध पाजलं मोठं केलं, तेच माझ्या विरोधात आंदोलन करताय याचे मला दुःख होत आहे. रूपाली चाकणकर यांचा आदराने मी तेरावेळा ताई म्हणून उल्लेख केला, एकदा माझी प्रतिक्रिया पाहा. किरीट सोमय्या यांचे नागडे फोटो दाखवले तेव्हा तुम्ही आंदोलन केले नाही, असा हल्लाबोल त्यांनी टीका करणाऱ्यांवर केलाय.
विषारी पिल्लांना मी मोठं केलंय, याचं दुःख : एकनाथ खडसे
दरम्यान, एकनाथ खडसे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्याबाबत मोठा दावा केला आहे. गिरीश महाजन यांच्या अनेक सिड्या ह्या प्रफुल लोढाकडे आहेत असेल त्यांनी म्हटले आहे. मला कशाला आंदोलन करून जोडे मारतात, त्या गिरीश महाजनांना जोडे मारा, प्रफुल लोढाला जोडे मारा. माझ्या विरोधात भाजपचे लोक आंदोलन करताय, मी एका पदाधिकाऱ्याला विचारले काय रे कशाला आंदोलन केले? तो म्हटला वरून आदेश आले म्हणून तुमच्या विरोधात आंदोलन केलं. विषारी पिल्लांना मी मोठं केलंय, याचा मला दुःख वाटतंय. मी कधीही माझ्या जावयाचे समर्थन केलेले नाही. कुणाची एक तरी तक्रार आहे का? तरीदेखील रूपाली चाकणकर या कुणाच्या आधारावर बोलताय? तुमचा मुलगा घराबाहेर गेल्यावर तुम्हाला कळतं का की तो काय करतोय? दारू पितोय का ते? फक्त राजकारणात नाथाभाऊंना बदनाम करून हनी ट्रॅप वरून लक्ष विचलित करण्यासाठी हे उद्योग सध्या सुरू आहेत, असे म्हणत एकनाथ खडसे यांनी रूपाली चाकणकर आणि गिरीश महाजनांवर निशाणा साधलाय.
https://www.youtube.com/watch?v=fvvisqnx1f_a
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.