‘सिद्धेश कारवाई झालीच पाहिजे’; एकनाथ शिंदेंचा भर मंचावरून रामदास कदमांच्या लेकाला फोन, नेमकं का
मराठी: वणी नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या तोंडावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (मराठी) यांच्या प्रचारसभेत घडलेला एक प्रसंग संपूर्ण राज्यभरात चर्चेचा विषय ठरला आहे. शहरातील वाढत्या प्रदूषणाबाबत नागरिकांच्या तक्रारी ऐकत असताना शिंदेंनी थेट मंचावरूनच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम (Siddesh Kadam)(रामदास कदम यांचे चिरंजीव) यांना फोन लावला आणि तात्काळ कारवाईचे आदेश दिले.
मराठी: नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
“सिद्धेश, मी वणीत आलोय. इथे कोळशामुळे हवा व पाणी गंभीरपणे दूषित झाले आहे. लोकांच्या जीवन-मरणाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. कारवाई झालीच पाहिजे,” असे ठाम शब्दांत शिंदेंनी केलेल्या सूचनेनंतर सिद्धेश कदम यांनी अवघ्या 24 तासांत कारवाई करण्याचे आश्वासन दिले. यानंतर नागरिकांनी सभेत टाळ्यांचा कडकडाट करून प्रतिसाद दिला.
मराठी: मी शब्द दिला तर मागे हटत नाही
शासकीय मैदानात झालेल्या या सभेची सुरुवात शिंदेंनी 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली वाहून केली. संविधान दिनानिमित्त शुभेच्छा दिल्यानंतर त्यांनी वणीतील पाणीटंचाई, खडबडीत रस्ते आणि प्रदूषण या तिन्ही मुद्द्यांवर ठाम भूमिका मांडली. “मी शब्द दिला तर मागे हटत नाही. वणीतील समस्या सोडवणे ही माझी जबाबदारी आहे,” असे ते म्हणाले.
मराठी: वणीसाठी स्वतंत्र बायपास रस्ता मंजूर करणार
कोळसा खाणींमधून आणि रेल्वे सायडिंगमधून सतत होणाऱ्या धुळीच्या प्रसारामुळे ज्येष्ठ नागरिकांना होणारे श्वसनाचे विकार, ट्रक वाहतुकीमुळे रस्त्यांची होणारी दुरवस्था यांचा उल्लेख करत शिंदे म्हणाले की, वणीसाठी स्वतंत्र बायपास रस्ता मंजूर करण्यात येईल. नगरपरिषद निधीचा अपहार झाल्याच्या तक्रारींचा उल्लेख करत त्यांनी चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल, असेही स्पष्ट केले.
मराठी: लाडकी बहीण योजना बंद पडणार नाही
महिला सक्षमीकरणाचा उल्लेख करत शिंदेंनी वणीला “महिला सबलीकरणाचे शक्तिपीठ” असे संबोधले. नगराध्यक्ष पदासाठी उभ्या असलेल्या महायुतीच्या उमेदवार पायल तोडसाम ही तुमची लाडकी बहीण आहे, असे सांगत महिलांनी विधानसभेसारखाच चमत्कार नगरपरिषद निवडणुकीतही घडवावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. “लाडकी बहीण योजना बंद पडणार नाही,” असा विश्वासही त्यांनी नागरिकांना दिला. सभेला पालकमंत्री संजय राठोड, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा संघटक विजय चोरडिया, नगरसेवक पदाचे उमेदवार, कार्यकर्ते आणि मोठ्या प्रमाणावर नागरिक उपस्थित होते. मैदानात विशेषत: महिलांची लक्षणीय उपस्थिती जाणवत होती.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.