शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे कडाडले
मराठी : कोणत्याही खुर्चीपेक्षा आपला स्वाभीमान महत्वाचा आहे. ही शिकवण आपल्याला बाळासाहेंबानी दिली असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. शिवसेनेच्या मेळाव्यात ते बोलत होते. तुम्ही आमदार व्हाल, खासदार व्हाल, मंत्री व्हाल पण तुम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहात हे विसरु नका असे एकनाथ शिंदे म्हणाले. बाळासाहेबांचे विचार सोडणाऱ्यांची अवस्था काय झालीय बघा? ज्यांनी विचार सोडले त्यांना सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही. ना घर का ना घाट का? अशी त्यांची अवस्था झाली आहे, असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.
स्वबळावर निवडणुका लढवण्यासाठी मनगटात ताकद लागते
स्वबळावर निवडणुका लढवण्यासाठी मनगटात ताकद लागते. घऱात बसून लढता येत नाही. तुम लढो हम कपडे सांभालते है असं चालत नाही असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. बाळासाहेबांच्या विचारांचे मारक ते काय बांधणार स्मारक असा टोला देखील उद्धव ठाकरेंना लगावला. तुम्ही विधानसभेला 97 जागा लढवल्या 20 जिंकल्या. आम्ही 80 जागा लढवल्या आणि तब्बल 60 जागा जिंकल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. आता सांगा खरी शिवसेना कोणाची? जनतेने शिवसेनेवर शिक्कामोर्तब केला आहे. अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन अभी पूरा आसमान बाकी आहे.
आज बाळासाहेब असते तर आपल्या सगळ्यांची पाठ त्यांनी थोपाटली असती
आज बाळासाहेब असते तर आपल्या सगळ्यांची पाठ त्यांनी थोपाटली असती. आज लाडक्या बहिणींनी माझा सन्मान केला. हा माझ्या घरचा सन्मान असल्याचे एकनाथ शिंदे. तुम्ही साथ दिली म्हणून शेतकऱ्याचा मुलगा राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. सर्वांचा मी ऋणी आहे. गाव तिथं शिवसेना आणि घर तिथं शिवसेना हे आपलं उद्दीष्ट असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले.
शिवसेनेचा भगवा सर्वांच्या साथीने फडकवत ठेवणार
माझ्यासोबत सगळ्यांनी रात्रीचा दिवस केला. मोठा विजय मिळवला आहे. ऐतिहासाहीक विजय असल्याचे शिंदे म्हणाले. दुप्पट वेगाने चौपट काम करावं लागेल. शिवसेनेच भगवा सर्वांच्या साथीने फडकवत ठेवेल. बाळासाहेबांच्या वितचारांशी प्रतारणा होणार नसल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. मी कालही कार्यकर्ता आजही कार्यकर्ता आणि उद्याही कार्यकर्ता असणार आहे. सर्वांच्या आशिर्वादाने मला सगळं मिळालं आहे. सर्वांची सेवा करता आली, त्यांच्या आयुष्यात मला बदल घडवता आला. लाडक्या बहिणींचा भाऊ ही माझी ओळख सर्वात मोठी आहे. जिनके इरादे बुलंद होते वही चट्टानों को चीरकर मंजिल तक पहुंच जाते हैं असेही एकनाथ शिंदे म्हणाले.
अधिक पाहा..
Comments are closed.