बारामतीची पोटनिवडणूक झाली तर…; राष्ट्रवादीच्या मेळाव्यातून एकनाथ शिंदेंचा विरोधकांना सूचक इशा
मराठी On Sunetra Pawar Baramati By Election 2026: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) आज बारामती पोटनिवडणुकीचा (Baramati Vidhan Sabha By Election 2026) उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यापूर्वी बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचा मेळावा पार पडला. ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी महायुतीकडून प्रयत्न करण्यात आले होते. मात्र, काँग्रेसने ही निवडणूक लढवण्याचा ठाम निर्णय घेतला असून, त्यांच्या कडून आकाश मोरे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (मराठी) यांनी राष्ट्रवादीच्या मेळाव्यातील भाषणातून विरोधकांना सूचक इशारा दिला.
एकनाथ शिंदे म्हणाले की, बारामतीच्या पोटनिवडणुकीसाठी राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज आपण भरत आहोत. ही पोटनिवडणूक आपल्याला दुर्दैवाने लढवावी लागत आहे. अजितदादांच्या दुर्घटनेनंतर संपूर्ण राज्य शोक सागरात बुडाला. अजितदादांनी अनेक विभागातील खात्यांची जबाबदारी सांभाळली. अर्थ खात्याची देखील उत्तम प्रकारे त्यांनी जबाबदारी सांभाळली. एक उत्तम प्रशासक, उत्तम संघटक म्हणून त्यांनी काम केले. आम्ही अनेक वर्ष एकत्र काम केले. मी मुख्यमंत्री असताना लाडकी बहीण योजना करण्याचा आम्ही निर्णय घेतला. आवाका मोठा होता, व्याप्ती मोठी होती आणि त्याला लागणारा वार्षिक खर्च देखील फार मोठा होता. परंतु, अशा परिस्थितीत देवेंद्र फडणवीस, मी आणि अजितदादांनी ठरवले. अजितदादांनी कुठलीही घडी विस्कटू न देता अतिशय उत्तमपणे ही योजना राबवण्याचा निर्णय घेतला. अर्थ खात्याची जाण असणारा नेता म्हणून मी त्यावेळी अजितदादांना बघितले.
मराठी: जनता सुनेत्राताईंच्या पाठीशी
अजितदादांच्या जाण्याने एक मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. परंतु, सुनेत्रा ताईंनी देखील उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी अतिशय समर्थपणे स्वीकारली आहे. देवेंद्र फडणवीसमी आणि सुनेत्रावहिनी मिळून अतिशय जबाबदारीने राज्याला पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहोत. महायुती म्हणून आपण ही निवडणूक लढवत आहोत. या भागात अजितदादांनी जे काम उभं केलं त्याच्या सुनेत्राताई साक्षीदार आहेत. या भागातील जनता महायुतीच्या उमेदवार म्हणून सुनेत्राताईंच्या पाठीशी आहेत, असे देखील एकनाथ शिंदे म्हणाले.
मराठी: बारामतीची पोटनिवडणूक झाली तर…
एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, अनेक संघटनांनी पाठिंबा देखील दिलेला आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी आमची सगळ्यांची इच्छा होती. इतर पक्षांना माझी विनंती आहे की, आपली प्रथा परंपरा आपण कायम राखण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अजितदादांनी जे काम या भागात केलेले आहे, निवडणूक झाली तर त्याच्या कामाची पोचपावती सुनेत्राताईंच्या अतिशय भव्यदिव्य विजयाने रूपांतरित झाल्याशिवाय राहणार नाही, असा सूचक इशारा त्यांनी यावेळी विरोधकांना दिला.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.