मोठी बातमी! शिंदेंच्या शिवसेनेच्या माजी आमदाराला अटक; तब्येत बिघडल्याने रुग्णालयात हलवलं
नंदूरबार : राज्यातील महापालिका निवडणुकांचे (Election) निकाल लागले असून आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. एकीकडे महापालिकेचा गुलाल आणखी खांद्यावर असतानाच दुसरीकडे पुन्हा उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात होत आहे. त्यातच, नंदूरबारमध्ये (Nandurbar) राजकीय वातावरण तापले असून, शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार शिरीष चौधरी यांना नंदूरबार शहर पोलिसांनी (police) अटक केली आहे. माजी आमदार शिरीष चौधरी यांच्यावर दरोडा आणि अॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल आला होता, त्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे….
शिरीष चौधरी यांचा मुलगा प्रथमेश चौधरी यांना नगरपालिका निवडणुकीनंतर झालेल्या निवडीत उपनगराध्यक्ष पद मिळाले. या निवडीनंतर काढण्यात आलेल्या विजय मिरवणुकीत वाद झाला होता. या वादानंतर रात्री शिरीष चौधरी यांच्या घराची तोडफोड करण्यात आली होती. या घटनेनंतर शहरातील राजकीय वातावरण तणावपूर्ण बनले होते, तसेच दोन्ही बाजूंनी एकमेकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर, आज माजी आमदार शिरीष चौधरी यांना अटक करण्यात आली. मात्र, अटकेनतंर त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
या प्रकरणात माजी आमदार चौधरी यांच्या फिर्यादीवरुन दाखल केलेल्या गुन्ह्यातील काही आरोपींनाही पोलिसांनी अटक केली आहे. या अटकेमुळे नंदूरबारच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, पोलिसांकडून आता पुढे काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा
आणखी वाचा
Comments are closed.