शिवसेना शिंदे गटाच्या डिनेर डिप्लोमसीला जाणारे ठाकरे गटाचे ‘ते’ 2 खासदार कोण?
मराठी Shivsena Operation Tiger: राज्याच्या राजकारणात सध्या ‘ऑपरेशन टायगर’च्या (Operation Tiger) चर्चांना उधाण आले असतानाच, शिंदे गटाच्या एका खास मेजवानीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. शिंदे सेनेचे नेते आणि केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांनी आयोजित केलेल्या ‘डिनर डिप्लोमसी’ला चक्क शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या दोन बड्या खासदारांनी हजेरी लावली. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना वेग आला आहे.
मराठी Shivsena Operation Tiger: मेजवानीला उपस्थित असलेले ‘ते’ 2 खासदार कोण?
1. नागेश आष्टीकर (खासदार, नांदेड)
2. संजय देशमुख (खासदार, यवतमाळ–वाशिम).
या दोन खासदारांनी ऑपरेशन टायगरच्या चर्चा सुरू असतानाच प्रतापराव जाधव यांच्या स्नेहभोजनाला कार्यक्रमाला उपस्थिती लावली. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
Nagesh Ashtikar: काय म्हणाले नागेश आष्टीकर?
याबाबत नागेश आष्टीकर यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटले आहे की, शिवसेना शिंदेंचे खासदार आणि केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या अॅनिव्हर्सरीचा कार्यक्रम होता. त्यांनी आम्हाला सभागृहामध्ये विनंती केली होती. त्यामुळे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी घरी गेलो होतो. 5-10 मिनिटांसाठी गेलो आणि भेटलो. याचा अर्थ आम्ही वेगळ्या चर्चेला गेलो होतो असं नाही. काही बातम्या नसल्या की ऑपरेशन टायगरची चर्चा होते. पण त्यात तथ्य नाही. मला वाटतं सुख-दुख:त एकमेकांना भेटलं पाहिजे. एकाच सभागृहातील असल्याने या भेटीत काही गैर नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंच्या भेटीचा दाखला
दरम्यान, काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी भाजपच्या संबंधित मोहित कंबोज यांच्या एका पार्टीत सहभागी झाले होते. त्यामुळे तुम्ही देखील शिंदे गटाचे खासदार असणाऱ्या प्रताप जाधव यांच्या पार्टीला हजर राहिले का?, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर नागेश आष्टीकर म्हणाले की, मोहित कंबोज यांना आदित्य ठाकरे भेटले याचा आणि आमच्या भेटीचा काही संबंध नाही. आदित्य ठाकरे हे आमचे नेते आहेत. आम्ही प्रतापराव जाधवांच्या घरी गेलो होतो यात दुमत नाही, आम्ही शुभेच्छा देण्यासाठी गेलो होतो, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
Maharashtra Politics: 6 खासदार उद्धव ठाकरेंची साथ का सोडणार?; महत्वाची 5 कारणं आली समोर
आणखी वाचा
Comments are closed.