दादा तुमचा निर्णय चुकला, माघारी या, मी माझा मोठा भाऊ गमावला; अजित पवारांच्या आठवणी सांगताना एकन
मराठी Speech on Ajit Pawar: दादा म्हणजे स्पष्टवक्तेपणा, वक्तशीरपणा पाळणारा नेता होता. दादा तुमचा हा निर्णय चुकलेला आहे, माघारी या. आज सभागृहात पाहताना ते डोळ्यासमोर दिसत आहेत, अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याचे दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला. राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवारी सुरुवात झाली. यावेळी विधिमंडळाच्या सदस्य असलेल्या दिवंगत नेत्यांना आदरांजली वाहण्यासाठी शोक प्रस्ताव मांडण्यात आला. यावेळी एकनाथ शिंदे बोलत होते.
एकनाथ शिंदे म्हणाले की, अधिवेशनाचा आज पहिला दिवस. गेली 22-23 वर्ष काम करत असताना आजचा दिवस सर्वांसाठी प्रचंड दुःखाचा दिवस आहे. आपल्या एका सहकाऱ्याबाबत बोलण्याची वेळ येणे हे दुःखद आहे. त्यातही अजित पवारांसारखा नेता असेल तर ते अति दुःखद आहे. अजित पवारांच्या जाण्याने पोकळी कधीच भरू शकत नाही. अजित पवारांना श्रद्धांजली अर्पण करतो. आज त्यांची पावलोपावली उणीव भासत आहे. काल पत्रकार परिषदेला ते नव्हते. शिव जयंतीला देखील ते नव्हते, आज सभागृहात देखील ते नाही. हे दुःखद आहे.
मराठी Speech on Ajit Pawar: देवेंद्रजी आणि मी मित्र गमावला
ज्या दिवशी अजित पवार गेले, त्यादिवशी प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू होते. लाख गेले तरी चालतील. पण, लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. नियती समोर ते जिंकू शकले नाही. लाखो अनुयायांना ते पोरके करून गेले. या घटनेने पवार कुटुंबावर काळाने घाला घातला. मी देखील हे दुःख अनुभवलं आहे. माझी दोन मुले अपघातात गेली. माझे गुरु आनंद दिघे यांना देखील अपघातात मी गमावलं आहे. दादा आपल्यासोबत नाही हे मान्य होतं नाही. शब्द आणि वेळेला महत्व देणारा नेता आपण गमावला आहे. देवेंद्रजी आणि मी मित्र गमावला आहे, अशा भावना एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केल्या.
मराठी Speech on Ajit Pawar: एकनाथ शिंदेंनी सांगितली 'ती' आठवण
एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, प्रचंड अभ्यासू, प्रशासनावर पकड असणारा हा नेता होता. त्यांनी हातात फाईल घेतली की काय कमी आहे हे लगेच ते सांगायचे. बैठकीत साधा कागदाचा तुकडा पडला तरी ते त्यांना चालत नव्हते. ते कधीच नकारात्मक बोलत नव्हते. कोरोना काळात ते मंत्रालयात जाऊन काम करत होते. त्यांच्यासोबत काम करताना काही घटना आठवतात. सरकार स्थापनेच्या चर्चा सुरू असताना आम्ही पत्रकार परिषद घेत होतो. त्यावेळी त्यांनी माझ्या हातातून माईक घेतला आणि म्हणाले एकनाथरावांचं माहिती नाही पण मी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे. लाडकी बहीण योजना राबवायची आहे. आमच्या तिघांचं एकमत झालं. राज्याचा आर्थिक गाडा व्यवस्थित सांभाळला. त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा आपल्याला फायदा होत होता. अधिवेशन काळात ते पूर्णवेळ थांबायचे. विरोधी पक्षाच्या प्रश्नांना उत्तर द्यायचे. कामात कधीच तडजोड करत नव्हते, असे देखील त्यांनी म्हटले.
मराठी Speech on Ajit Pawar: तर अजितदादा नक्कीच मुख्यमंत्री झाले असते
दुर्दैवाने अजित पवारांना मुख्यमंत्री होता आले नाही. नशिबाने साथ दिली असती तर ते नक्कीच मुख्यमंत्री झाले असते. राजकारणात मतभेद असतात, वाद असतात. मात्र, ते अजात शत्रू होते. त्यांनी राजकारणात खिलाडूपणा कायम जपला. माझा आणि त्यांचा राजकीय प्रवास समांतर होता. जनतेच्या न्यायालयात आम्ही घेतलेला निर्णय योग्य ठरला. अधिकाऱ्यांना पहाटे पाच वाजता ते बोलवायचे. अधिकाऱ्यांची फरफट होत होती. मात्र, आमचं सरकार 24/7 काम करणारं सरकार होतं. दादा त्यांच्या विधानाने काहीवेळा अडचणीत आले. मात्र, त्यांनी परिणामांची पर्वा केली नाही. त्यांनी पहाटेचा शपथविधी केला. त्यांच्या अंगावर सगळा विषय आला. मात्र, ते मागे हटले नाहीत, अशी आठवण एकनाथ शिंदे यांनी करून दिली.
एकनाथ शिंदे यांचे अजित पवारांवर भाषण : दादा तुमचा निनाम चुकला, माघारी या
एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, दादा म्हणजे स्पष्टवक्तेपणा, वक्तशीरपणा पाळणारा नेता होता. दादा तुमचा हा निर्णय चुकलेला आहे, माघारी या. आज सभागृहात पाहताना ते डोळ्यासमोर दिसत आहेत. सुनेत्रा पवारांनी जबाबदारी स्वीकारली. कार्यकर्त्यांना आणि सहकाऱ्यांना त्या धीर देत आहेत. आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत. विकास आता लांबणार नाही, विकास आता थांबणार नाही, ही घोषणा आम्ही पुढे घेऊन जात राहू, असे त्यांनी शेवटी म्हटले.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.