उद्धव ठाकरेंना माफ करा, सडका मेंदू साफ करा, शिंदेंचे शिवसैनिक बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर, ने

उधव ठाकरे इंडिया अलायन्स बैठक: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. काल (7 ऑगस्ट) लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या निवासस्थानी इंडिया आघाडीधील घटक पक्षांची बैठक झाली. या बैठकीला उद्धव ठाकरे यांच्यासह ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) देखील उपस्थित होते. या बैठकीदरम्यान राहुल गांधी यांनी मतदार याद्यांमधील घोळ आणि निवडणूक आयोगासंदर्भातील प्रेझेंटेशन दिलं. यादरम्यानचे काही फोटोही समोर आले आहेत. या फोटोमध्ये उद्धव ठाकरेंसह संजय राऊत, आदित्य ठाकरे शेवटच्या रांगेत बसल्याचे दिसत आहे. उद्धव ठाकरेंना शेवटच्या रांगेत बसवल्याने शिवसेना शिंदे गटाकडून डिवचण्यात येत आहे. यासाठी आज शिवसेना शिंदे गटाचे आमदार, नेते आणि प्रवक्ते छत्रपती शिवाजीपार्क येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर पोहचले.

दिल्लीत इंडिया आघाडीच्या बैठकीत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना सर्वांत शेवटच्या रांगेत बसवून काँग्रेसने अवमानजनक वागणूक दिली. काँग्रेससोबत जाऊन स्वत:चे अवहेलना उद्धव ठाकरे करुन घेत आहे, म्हणून स्मृतीस्थळावर बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून क्षमा करावी, अशी भूमिका शिंदेंच्या शिवसेनेकडून घेण्यात येत आहे. यावेळी आमदार मनीषा कायंदे, प्रवक्ते शितल म्हात्रे यांच्यासह शिवसेना शिंदे गटाचे इतर पदाधिकारी होते. यादरम्यान, उद्धव ठाकरेंना माफ करा, सडका मेंदू साफ करा, असं बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाजवळ शिंदेंचे शिवसैनिक बोलताना दिसले.

नरेश म्हस्के काय म्हणाले?

बाळासाहेबांनी आम्हाला आत्मसन्मान, स्वाभिमान शिकवला. अपमानाविरुद्ध पेटून उठायचा शिवरायांनी आणि बाळासाहेबांनी धडा दिला. तुम्ही यातलं काहीच घेतलं नाही का?काँग्रेसने तुमची काय ही अवस्था करून ठेवली आहे. तुमच्यापेक्षा एक-एक खासदारवाले पक्ष बरे… त्यांना सुद्धा पुढच्या रांगेत बसवलं… महाराष्ट्राची दिल्लीत जाऊन तुम्ही पार लाज घालवलीत, असं म्हणत नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.

उद्धव ठाकरे मागच्या रांगेत, संजय राऊत काय म्हणाले?

मागे बसल्याची टीका करणारे लोक फालतू आहेत. समोर स्क्रीनवर काही प्रेझेंटेशन होत होते. उद्धवजींना पुढे बसवले होते. पण, त्यांचे म्हणणे पडले की स्क्रीनच्या समोर बसून पाहताना त्रास होतो किंवा नीट दिसत नाही. त्यामुळे आम्ही सर्वच पाठीमागे गेलो, असं संजय राऊतांनी सांगितले. हे भाजपचे आयटी सेलवाले फालतू लोक आहेत. त्यांना समजायला हवे. उद्धव ठाकरेंचे अजून पण फोटो आहेत, ते तुम्ही पाहिले नाहीत का? उद्धव ठाकरे, रश्मी वहिनी, आदित्य ठाकरे यांना राहुल गांधी, सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी यांनी त्यांचा नवीन घर संपूर्ण दाखवलं. त्या ठिकाणी प्रेझेंटेशन सुरू होते. मी स्वतः तिथे होतो. कमल हसन होते. शरद पवार देखील आमच्या सोबत बसले होते. प्रमुख नेत्यांना पुढे बसवले होते. पण, उद्धव ठाकरे म्हणाले इथून दिसणार नाही. त्यामुळे ते मागे आले होते, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

https://www.youtube.com/watch?v=ldrmorfnbvg

संबंधित बातमी:

Sanjay Raut : इंडिया आघाडीच्या बैठकीत ठाकरेंना शेवटच्या रांगेत बसवलं, टीका करणाऱ्यांवर संजय राऊत तुटून पडले, नरेश म्हस्केंना ‘दुतोंडी गांडूळ’ म्हणत डिवचलं

आणखी वाचा

Comments are closed.