मुंबईत मराठा आंदोलक आक्रमक, पण एकनाथ शिंदे अमित शाहांची भेट घेऊन लगेच गावी जाणार; चर्चांना उधाण

मराठी : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मुंबईच्या आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचे बेमुदत उपोषण कालपासून सुरू आहे. मुंबईत मराठा समाजाचे आंदोलन सुरू असतानाच शुक्रवारी रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) हे मुंबईत दोन दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत. आज ते लालबागचा राजाचे दर्शन घेणार आहेत. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या वर्षा निवासस्थानी अमित शाह हे गणरायाचे दर्शन घेण्यासाठी जाणार असल्याचे देखील सांगितले जात आहे. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा मुंबई दौरा आटपून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (मराठी) हे आज शनिवारी (दि. 30) सातारा येथील दरे गावी जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज साताऱ्यातील दरे गावी जाणार आहेत. गावच्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी शिंदे हे आपल्या मूळ गावी जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वीच एकनाथ शिंदेंचे नातू रुद्राक्ष याच्याकडून गावातील गणपतीची विधीवत पूजा करण्यात आली होती. त्यानंतर आता एकनाथ शिंदे स्वतः दर्शनासाठी दरे गावी जाणार आहेत.

शिंदेंच्या दरे गाव दौर्‍यामुळे चर्चांना उधाण

मात्र याचवेळी मुंबईत मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आझाद मैदानात आमरण उपोषणाला बसलेले आहेत. राज्यभरातून मराठा समाज मुंबईत येत असून आंदोलन अधिक तीव्र होत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारकडून अद्याप कोणतेही अधिकृत प्रतिनिधी किंवा शिष्टमंडळ जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी गेलेले नाही, त्यातच एकनाथ शिंदे गणपती दर्शनासाठी दरे गावात जाणार असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

अमित शाह यांची विनोद तावडे यांच्यासोबत चर्चा

मुंबई दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यासोबत चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीत राज्यातील मराठा आरक्षणाचा मुद्दा, बिहार विधानसभा निवडणुका आणि उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा झाल्याचं बोललं जात आहे. विशेषतः मुंबईत सुरू असलेल्या मराठा आंदोलनाची माहिती अमित शहा यांनी विनोद तावडे यांच्याकडून घेतल्याचीही माहिती मिळत आहे. या चर्चेतून आंदोलनावर काही ठोस तोडगा निघाला का? आणि सरकारची पुढील भूमिका काय असेल? हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.

https://www.youtube.com/watch?v=p98jrycwwno

आणखी वाचा

Manoj Jarange Patil Maratha Mumbai Morcha: मराठा समाजासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; मनोज जरांगेंचं मुंबईत आंदोलन सुरु असताना वेधलं लक्ष

आणखी वाचा

Comments are closed.