वरळी हिट अँड रन केसमधील आरोपीच्या वडिलांना एकनाथ शिंदेंनी पुन्हा पक्षात घेतलं, वादाला तोंड फुटण

मराठी : वसई-विरार महापालिकेचे माजी नगरसेवक आणि 10 कोटींच्या खंडणीप्रकरणातील आरोपी स्वप्नील बांदेकर (Swanil Bandekar) यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (मराठी) यांनी सोमवारी शिवसेनेत प्रवेश देण्यात आला. तर वरळीतील ‘हिट अँड रन’ प्रकरणानंतर निलंबित करण्यात आलेले माजी उपनेते राजेश शहा (Rajesh Shah) यांना थेट व्यासपीठावर स्थान दिल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

ही घटना पालघर तालुक्यातील मनोर येथील एका रिसॉर्टमध्ये पार पडलेल्या शिवसेनेच्या संघटनात्मक बैठकीदरम्यान घडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी शिंदे होते. यावेळी बोईसरचे आमदार विलास तरे, पालघरचे आमदार राजेंद्र गावित, संपर्कप्रमुख रवींद्र फाटक आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते. या पार्श्वभूमीवर वादग्रस्त व्यक्तींना व्यासपीठावर स्थान दिल्याने, शिंदे नेमके कोणत्या निकषांवर पक्षप्रवेश देतात, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

खंडणीचा आरोप असूनही पक्षप्रवेश

वसई-विरार महापालिकेत 2015 ते 2020 या कालावधीत नगरसेवक असलेले स्वप्नील बांदेकर यांचा प्रवेश एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला. मात्र, बांदेकर यांच्यावर एका बांधकाम व्यावसायिकाकडून 10 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा गंभीर आरोप असूनही, त्यांना पक्षात घेण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. नवघर पोलिसांनी सापळा रचून खंडणीपैकी 25 लाख रुपये स्वीकारताना बांदेकर यांना त्यांच्या दोन सहकाऱ्यांसह अटक केली होती. या प्रकरणात किशोर काजरेकर, निखिल बोलार आणि हिमांश शहा यांचाही समावेश होता. पोलिसांनी हिमांश शहा याला भाईंदरमधील बनाना लिफ हॉटेलमध्ये अटक केली होती.

स्वप्नील बांदेकर यांनी आकाश गुप्ता यांच्या वरळीतील झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाविरोधात केलेल्या तक्रारी मागे घेण्यासाठीच ही खंडणी मागितल्याचा आरोप आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर ते ठाकरे गटात गेले होते. आता त्यांनी पुन्हा शिंदे गटात प्रवेश केला आहे.

राजेश शहांना व्यासपीठावर स्थान

तर वरळीतील हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहीर शाहचे वडील शिवसेनेचे माजी उपनेते राजेश शहा यांचे काही काळापूर्वी निलंबन करण्यात आले होते. तर या बैठकीत राजेश शाह यांना व्यासपीठावर स्थान देण्यात आले. त्यांच्या उपस्थितीमुळे अनेकजण आश्चर्यचकित झाले. दरम्यान, या कार्यक्रमात माजी आमदार श्रीनिवास वनगा यांनी सुरुवातीला व्यासपीठावर न जाता सामान्य कार्यकर्त्यांमध्ये बैठक मांडल्याचे दृश्यही लक्षवेधी ठरले. तर, पालघर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रकाश निकम, जे विधानसभेत बंडखोर उमेदवार म्हणून ओळखले जातात, भाजपकडून आगामी निवडणूक लढवण्याची शक्यता असल्याने या बैठकीपासून लांब राहिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq

आणखी वाचा

Devendra Fadnavis on Mumbai Kabutar Khana: देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘कबुतरखाने अचानक बंद करणे योग्य नाही’; कबुतरांना खाणं देण्याची जबाबदारीही बीएमसीलाच दिली

आणखी वाचा

Comments are closed.