शेतकरी कर्जमाफीला निवडणूक आयोगाचा हिरवा कंदील

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक खुशखबर आहे. कर्जमाफी योजनेला केंद्रीय निवडणूक आयोगाने हिरवा कंदील दिला आहे. विधान परिषद निवडणुकीमुळे लागू झालेल्या आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर कर्जमाफीची प्रक्रिया रखडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. मात्र निवडणूक आयोगाने या योजनेला मंजुरी दिल्याने 30 जूनपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना 30 जूनपूर्वी कर्जमाफी देण्याची घोषणा केली आहे. त्यासाठी सरकारने पात्र शेतकऱ्यांची माहिती संकलित करणे, बँकांकडून थकीत कर्जाचा तपशील मागवणे तसेच आर्थिक तरतुदी करणे आदी काम सुरू केले होते. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी सध्या राज्यात आचारसंहिता लागू आहे. त्यामुळे कर्जमाफीची प्रक्रिया आचारसंहितेत अडकण्याची शक्यता होती. शेतकरी वर्गही त्यामुळे चिंतेत पडला होता. आता आयोगानेच कर्जमाफीच्या योजनेला मंजुरी दिल्याने कर्जमाफीच्या अंमलबजावणीतील अडथळा दूर झाला आहे.

ज्या शेतकऱ्यांचे 30 सप्टेंबर 2025पर्यंत थकीत पीक कर्ज आहे, त्यांना 2 लाखांच्या मर्यादेत कर्जमाफी देण्याची तसेच नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन निधी दिला जाणार आहे.

Comments are closed.