मंत्रालयात चोर शिरला, मंत्री संजय राठोड यांच्या केबिनमधून 80 हजार पळवले

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

राज्यातील सर्वात चोख सुरक्षा व्यवस्था असलेल्या मंत्रालयातच चोरट्यांनी डल्ला मारला आहे. तोसुद्धा थेट एका कॅबिनेट मंत्र्याच्या केबिनमध्ये. मृदा व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या केबिनमधून सोमवारी तब्बल 80 हजार रुपयांची रोकड चोरीला गेली. मंत्रालयात चोरी होणे ही गंभीर बाब असली तरी 10 हजार रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम घेऊन मंत्रालयात प्रवेशबंदी असताना 80 हजारांची कॅश आली कुठून अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

मंत्रालयाची स्वतंत्र सुरक्षा नियमावली आहे. कोणत्याही अभ्यागत व्यक्तीला किंवा कर्मचाऱ्याला आपल्यासोबत 10 हजार रुपयांपेक्षा जास्त रोकड आत घेऊन जाण्यास मनाई आहे. त्यासाठी मंत्रालयात प्रवेशासाठी असलेल्या सर्वच प्रवेशद्वारांवर कडक तपासणी केली जाते. त्यानंतरही 80 हजार रुपये संजय राठोड यांच्या कार्यालयात पोहोचले कसे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

संजय राठोड यांच्या केबिनमधून पैसे गायब झाल्याचे समजताच कर्मचाऱ्यांची मोठी धावपळ उडाली असून संशयाच्या संदर्भातून रात्री उशिरापर्यंत कर्मचाऱ्यांची कसून चौकशी करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे या संपूर्ण प्रकरणाची अद्याप कोणतीही अधिकृत पोलीस तक्रार नोंदवण्यात आलेली नाही. सीसीटीव्हींची करडी नजर असतानाही चोर सापडला कसा नाही, कोणत्या कारणास्तव 80 हजार रुपये राठोड यांनी केबिनमध्ये ठेवले होते याचा उलगडा करण्यासाठी पोलिसांकडून गुप्तपणे चौकशी केली जात आहे.

Comments are closed.