विधान परिषदेची 10 जागांची निवडणूक होणार बिनविरोध! अपक्ष उमेदवारांचे अर्ज ठरणार बाद
महाराष्ट्र विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. विधान परिषदेच्या 9 जागांसाठी नियमित निवडणूक तर एका जागेची पोटनिवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. मात्र, विधान परिषदेच्या 10 जागांसाठीची निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे निश्चित झाले आहे.
विधान परिषदेसाठी विविध पक्षांच्या 10 उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जांव्यतिरिक्त तीन अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहेत. असे असले तरी त्यांना 10 आमदारांची सूचक म्हणून सही नसल्याने या अपक्ष उमेदवारांचे अर्ज बाद ठरणार आहेत. त्यामुळे विधान परिषदेच्या 10 जागांसाठीची निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे निश्चित झाले आहे. कुठल्याही पक्षाने अकरावा उमेदवार न दिल्याने विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार आहे.
विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून 1 तर, सत्ताधारी महायुतीत भाजपकडून 6, शिंदे गटाकडून 2, अजित पवार गटाकडून 1 उमेदवाराचा अर्ज दाखल झाला आहे. महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अंबादास दानवे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर भाजपकडून सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे, प्रमोद जठार, प्रज्ञा सातव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. शिंदे गटाकडून नीलम गोऱ्हे आणि बच्चू कडू यांचे अर्ज दाखल झाले आहेत. अजित पवार गटाकडून झिशान सिद्दीकी यांना उमेदवारी दिली आहे.
Comments are closed.