महापौर ‘आपलाच’… लॉस एंजलिसमध्ये, हिंदुस्थानी वंशाच्या रमण यांची प्रचारात आघाडी
अमेरिकेतील लॉस एंजिल्सच्या महापौरपदासाठी येत्या 2 जून रोजी निवडणूक होत आहे. या निवडणुकीत मूळची हिंदुस्थानी नित्या रमन प्रमुख दावेदार म्हणून पुढे आली आहे. लॉस एंजिल्समध्ये सध्या कॅरेन बास हे महापौर आहेत. परंतु, अनेक सर्व्हेमधून नित्या यांची लोकप्रियता वेगाने वाढत असल्याचे म्हटले आहे. यामुळेच अनेक जण नित्या यांना आगामी ममदानीसुद्धा बोलत आहेत. काही महिन्यांपूर्वीच जोहरान ममदानी हे न्यूयॉर्कचे महापौर म्हणून निवडून आले आहेत.
30 एप्रिलपर्यंत झालेल्या पॉलीमार्पेट सर्व्हेमध्ये नित्या रमन या महापौर स्पर्धेत सर्वात पुढे आहे. या निवडणुकीत त्यांची एन्ट्री फेब्रुवारीत झाली आहे. परंतु, या निवडणुकीत नित्या अन्य उमेदवारांच्या पुढे निघताना दिसत आहे. नित्या यांची तुलना ममदानी यांच्यासोबत केली जात आहे. त्यामागे अनेक कारणे आहेत. मुळात हे दोघेही हिंदुस्थानी वंशांचे आहेत. याशिवाय, हे दोघेही एकसारखेच मुद्दे उपस्थित करत आहेत.
कोण आहे दररोज रमण?
नित्या रमन यांचा जन्म हा केरळमधील असून त्यांचा जन्म 28 जुलै 1981 मध्ये झाला. सहा वर्षांपर्यंत त्या हिंदुस्थानात वास्तव्य करत होत्या. त्यानंतर त्यांचे कुटुंब अमेरिकेत शिफ्ट झाले. अमेरिकेतील ल्युसियाना येथे त्यांचे कुटुंब स्थिरावले. 22 वर्षांनंतर त्या अमेरिकेच्या नागरिक बनल्या. मॅसाचुसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नोलॉजीमधून त्यांनी नागरी योजनेतून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण घेतले. याशिवाय, हार्वर्ड विद्यापीठातून शिक्षण घेतल्यानंतर त्या समाजकार्यात सक्रिय झाल्या होत्या. सध्या त्या लॉस एंजिल्सच्या डिस्ट्रिक्ट चारचे सिटी काऊंसिलचे सदस्य म्हणून प्रतिनिधित्व करत आहेत.
Comments are closed.