रिकी पॉटिंगला मागे टाकत जो रूटला आला अव्वल स्थानी, ‘या’ यादीत सचिन तेंडुलकर तिसऱ्या स्थानावर

इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. यामधील दुसरा सामना लॉर्ड्स येथे सुरू असून इंग्लंडचा कर्णधार जो रूटने इतिहास रचला आहे. त्याने मायदेशात कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पहिले स्थान काबीज केले आहे. त्याने अनेक वर्षे हा विक्रम आपल्या नावावर असलेल्या ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉटिंग याला मागे टाकले आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम क्रिकेटचा देव आणि भारतीय दिग्गज सचिन तेंडुलकर याच्या नावावर आहे. मात्र तो मायदेशात कसोटीमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे.
9 धावा करतात रूटचा विश्वविक्रम
पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेत रूटची कामगिरी अपेक्षेप्रमाणे होत नसली तरी, त्याने लॉर्ड्स कसोटीमध्ये एका विक्रमाची आपल्या नावे नोंद केली आहे. त्याने दुसऱ्या डावात 9 धावा करताच विश्वविक्रम केला.
रूटने पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात 9 धावा करताच पॉटिंगला मागे टाकले आणि मायदेशात कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला.
पॉटिंगने आपल्या घरच्या मैदानावर 92 कसोटी सामने खेळले. त्याने याच्या 154 डावांमध्ये 56.97 च्या सरासरीने 7578 धावा केल्या. यामध्ये 23 शतके आणि 38 अर्धशतकांचा समावेश आहे. दुसरीकडे रूटने आता 89 कसोटी सामने घरच्या मैदानावर खेळताना 7594 धावा करत त्याला मागे टाकले. यामध्ये 24 शतके आणि 35 अर्धशतकांच्या समावेश आहे.
मायदेशात कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सचिन तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत 94 सामने मायदेशात खेळताना 153 डावांमध्ये 52.67 च्या सरासरीने 7216 धावा केल्या. यामध्ये 22 शतके आणि 32 अर्धशतकांच्या समावेश आहे. या यादीत चौथ्या स्थानावर श्रीलंकेचा दिग्गज महेला जयवर्धने आणि दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज अष्टपैलू जॅक कॅलिस आहे.
घरच्या मैदानावर सर्वाधिक कसोटी धावा करणारे फलंदाज
जो रूट – 7594* रन
रिकी पाँटिंग – 7578 धावा
सचिन तेंडुलकर – 7216 धावा
महेला जयवर्धने – 7167 धावा
जॅक कॅलिस – 035 धावा
लॉर्ड्स कसोटीमध्ये पाकिस्तानने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे इंग्लंडने पहिल्या डावात फलंदाजी करत 290 धावा केल्या, प्रत्युत्तरात पाकिस्तानचा पहिला डाव 110 धावसंख्येवर संपुष्टात आला. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला असता इंग्लंडने 357 धावांची आघाडी घेतली आहे. डॅन लॉरेन्स 50 धावा आणि ऑली रॉबिन्सन 2 धावा करत क्रीजवर आहेत.
तीन सामन्यांच्या या मालिकेत यजमान इंग्लंडने पहिला सामना जिंकत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. (ENG vs PAK 2nd Test Joe Root surpasses Ricky Ponting to claim top spot; Sachin Tendulkar ranks third in Most Test Runs on Home list)
Comments are closed.