क्रिकेट जगत हादरलं! इंग्लंडच्या खेळाडूवर बलात्काराचे दोन आरोप, नेमकं प्रकरण काय?
क्रिकेट जगताला हादरवून सोडणारी मोठी घटना इंग्लंडमध्ये उघडकीस आली आहे. इंग्लंडच्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये 24 वर्षीय क्रिकेटपटू रॉबिन दास याच्यावर बलात्काराचे दोन गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या आरोपांमुळे त्याला एसेक्स क्रिकेट क्लबने तात्काळ निलंबित केलं असून त्याला 9 ऑक्टोबर रोजी इनर लंडन क्राउन कोर्टात हजर केले जाणार आहे.
मार्च 2024 मध्ये लंडनच्या ब्रिक्सटन भागात एका महिलेवर बलात्कार केल्याचा त्याच्यावर आरोप असून, याप्रकरणी गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये त्याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर 23 जुलै रोजी त्याच्यावर अधिकृतपणे गुन्हे दाखल करण्यात आला आहे. या गंभीर आरोपानंतर एसेक्स क्रिकेट क्लबने या प्रकरणावर निवेदन जारी करून, कायदेशीर प्रक्रियेत पूर्ण सहकार्य करत असल्याचे स्पष्ट केले आहे.
मेट्रोपॉलिटन पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित महिलेला सध्या तज्ज्ञ अधिकाऱ्यांमार्फत आवश्यक ती सर्व मदत आणि समुपदेशन दिले जात आहे. कायदेशीर प्रक्रिया अद्याप सुरू असल्यामुळे संबंधित क्रिकेट क्लबने यावर सध्यातरी अधिक भाष्य करण्यास नकार दिला आहे. रॉबिन दासने याआधी एसेक्सकडून काउंटी क्रिकेटमध्ये मिडिलसेक्सविरुद्ध वन-डे सामनाही खेळला होता.
Comments are closed.