10 गोलच्या थरारक सामन्यात इंग्लंडची फ्रान्सवर मात, 44 वर्षांनंतर फिफा वर्ल्ड कपमध्ये घडले 'असे'
फिफा विश्वचषक 2026 मध्ये रविवारी (19 जुलै) तिसऱ्या स्थानासाठी फ्रान्स आणि इंग्लंड भिडले. त्यामुळे मियामी स्टेडियमवर आलेल्या प्रेक्षकांना 10 गोलचा रोमांचक सामना पाहण्याची संधी मिळाली. हा सामना इंग्लंडने 6-4 असा जिंकला आणि स्पर्धेत तिसरे स्थान काबीज करत आपला प्रवास संपवला. इंग्लंडची ही 1966 नंतर या स्पर्धेच्या इतिहासातील सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. इंग्लंडने 1966 मध्ये पहिल्यांदा विश्वचषक जिंकण्याची कामगिरी केली होती.
10 गोलसह ऐतिहासिक कामगिरी
सामना सुरू झाला तेव्हा कोणीही अपेक्षा केली नव्हती, की हा सामना 10 गोलचा होईल ते. या स्पर्धेच्या इतिहासात 44 वर्षांपूर्वी अशी कामगिरी करण्यात आली होती. त्या सामन्यात 10 पेक्षा अधिक गोल झाले होते. आतापर्यंत या स्पर्धेत केवळ सहा सामन्यामध्ये 10 किंवा त्यापेक्षा अधिक गोल झाले आहेत. इंग्लंड विरुद्ध फ्रान्स सामन्याचा या यादीत सहावा क्रमांक लागतो.
याआधी फिफा विश्वचषक 1982 मध्ये हंगेरी आणि एल साल्वाडोर यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात तब्बल 11 गोल झाले होते. तो सामना हंगेरीने 10-1 असा जिंकला होता.
इंग्लंड विरुद्ध फ्रान्स हा सामना या स्पर्धेच्या इतिहासात तिसऱ्या स्थानासाठी सर्वाधिक गोल झालेला सामना ठरला आहे. तसेच 1982 पासून या स्पर्धेत सर्वाधिक गोल झालेल्या सामन्यांमध्ये हा दुसरा सर्वाधिक गोल झालेला सामना आहे.
सामन्याची स्थिती, इंग्लंडची पहिल्या हाफमध्ये 4-0 आघाडी नंतर फ्रान्सचा प्रतिहल्ला
सामन्याच्या तिसऱ्याच मिनिटाला डेक्लन राइसने इंग्लंडसाठी गोल करत आघाडी घेतली. इंग्लंडने पहिल्या हाफपर्यंतच ही आघाडी 4-0 अशी वाढवली. एझरी कोन्साने 18 व्या मिनिटाला तर बुकायो साकाने 37 आणि 46 व्या मिनिटाला गोल केले. त्यामुळे इंग्लंड सहज जिंकेल असे वाटत असताना फ्रान्सने दमदार पुनरागमन केले.
दुसरा हाफ सुरू होताच फ्रान्सने हल्ले सुरू केले. किलियन एम्बाप्पेने 48 व्या मिनिटाला फ्रान्ससाठी पहिला गोल केला. त्याच्या सहा मिनिटांनंतर लगेचच ब्रॅडली बार्कोलाने गोल करत सामन्याचा रोमांच वाढवला. एम्बाप्पेने पुन्हा एक गोल करत सामना 3-4 असा केला. त्याने 66 व्या मिनिटाला या सामन्यातील त्याचा दुसरा गोल केला.
सामना हातातून जात असताना इंग्लंडसाठी साकाने गोल करत आपली हॅट्ट्रीकही पूर्ण केली. त्यानंतर फ्रान्सच्या ओस्माने डेम्बेलेने 96 व्या मिनिटाला गोल करत सामना 4-5 असा केला होता, मात्र लगेचच इंग्लंडकडून आणखी एका गोलची भर पडली. ज्यूड बेलिंगहॅमने 98 मिनिटाला हा इंग्लंडचा सहावा गोल केला आणि संघाचा विजय निश्चित केला.
फिफा विश्वचषकातील ऐतिहासिक 10+ गोल झालेले सामने
ऑस्ट्रिया 7-5 स्वित्झर्लंड (12 गोल) – 1954
ब्राझील 6-5 पोलंड (11 गोल) – 1938
हंगेरी 8-3 जर्मनी (11 गोल) – 1954
हंगेरी 10-1 एल साल्वाडोर (11 गोल) – 1982
फ्रान्स ७-३ पॅराग्वे (१० गोल) –
फ्रान्स 4-6 इंग्लंड (10 गोल) – 2026
(इंग्लंडने 2026 च्या तिसऱ्या स्थानासाठी 10 गोलच्या रोमहर्षक सामन्यात फ्रान्सचा पराभव केला, हे FIFA विश्वचषक स्पर्धेत 44 वर्षात प्रथमच घडले.)
Comments are closed.