IND vs ENG: भारताविरुद्धच्या पहिल्या वनडेसाठी इंग्लंडची टीम जाहीर! मैदानात उतरताच जोस बटलर गाठणार ऐतिहासिक टप्पा

भारत आणि इंग्लंड दोन्ही देशांमध्ये 14 जुलै पासून 3 सामन्यांची वनडे मालिका खेळली जाणार आहे तत्पूर्वी वनडे मालिकेसाठी इंग्लंडने आपली प्लेइंग इलेव्हन जाहीर केली आहे.

कर्णधार हॅरी ब्रूकने (Captain of England Cricket team) अनुभवी खेळाडूंवर विश्वास दाखवला आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना उद्या, मंगळवार (१४ जुलै) रोजी बर्मिंगहॅमच्या एजबेस्टन क्रिकेट मैदानावर खेळवला जाईल. सामन्याच्या एक दिवस आधी इंग्लंड क्रिकेट बोर्डाने आपला संघ जाहीर केला.

टी-20 मालिकेत भारताचा 4-0 असा पराभव करणाऱ्या इंग्लंड संघाची धुरा पुन्हा एकदा हॅरी ब्रूकच्या खांद्यावर असेल. टी-20 मालिकेच्या तुलनेत संघ व्यवस्थापनाने संघात काही बदल केले आहेत. अनुभवी फलंदाज जो रूट (Joe Root & Ben Duccket) आणि बेन डकेट यांच्या पुनरागमनामुळे फलंदाजीचा क्रम अधिक मजबूत झाला आहे.

पहिल्या वनडे सामन्यात उतरताच यष्टिरक्षक फलंदाज जोस बटलर (Jos Buttler) आपल्या कारकिर्दीतील एक खास टप्पा गाठणार आहे. या सामन्यात जोस बटलर त्याच्या कारकिर्दीतील 200 वा वनडे सामना खेळणार आहे. त्याने 21 फेब्रुवारी 2012 रोजी दुबईमध्ये पाकिस्तानविरुद्ध वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. आता 13 वर्षांनंतर, या खास कामगिरीपर्यंत पोहोचणाऱ्या इंग्लंडच्या मोजक्या खेळाडूंमध्ये त्याचा समावेश होणार आहे.

इंग्लंडने युवा जेकब बेथेल आणि बेन डकेट यांच्यावर सलामीची जबाबदारी सोपवली आहे. जो रूट तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येईल. कर्णधार हॅरी ब्रूक, जोस बटलर आणि सॅम करन मधल्या फळीला बळकटी देतील. गोलंदाजी विभागात जोफ्रा आर्चर वेगवान आक्रमणाचे नेतृत्व करणार असून त्याच्यासोबत जोश टंग आणि फिरकीपटू विल जॅक्स, लियाम डॉसन व आदिल रशीद हे भारतीय फलंदाजांना आव्हान देण्यासाठी सज्ज असतील.

पहिल्या वनडेसाठी इंग्लंडची प्लेइंग 11: जेकब बेथेल, बेन डकेट, जो रूट, हॅरी ब्रूक (कर्णधार), जोस बटलर (यष्टिरक्षक), सॅम करन, विल जॅक्स, जोफ्रा आर्चर, लियाम डॉसन, जोश टंग, आदिल रशीद.

विशेष म्हणजे, नुकत्याच झालेल्या 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेत इंग्लंडने भारताचा 4-0 असा पराभव केला होता. पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता, त्यानंतर भारतीय संघाला सलग 4 सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला होता. आता टीम इंडियाचे लक्ष टी-20 मालिकेतील पराभवाचा बदला घेण्याकडे असेल.

Comments are closed.