शाळेत स्मार्टफोन नेण्यावर आता बंदी! ‘या’ देशातील सरकारने घेतला मोठा निर्णय, वाचा सविस्तर
इंग्लंडमधील शाळांमध्ये स्मार्टफोनच्या वापराबाबत सरकारने आता अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे. आतापर्यंत केवळ सूचना म्हणून लागू असलेले नियम आता कायद्याच्या स्वरूपात आणले जाणार आहेत. मुलांचे हित आणि शिक्षणाचे वातावरण अधिक चांगले करण्यासाठी सरकारने हा मोठा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे. ‘एबीपी न्यूज’ने याबाबतचे वृत्त दिले आहे.
या प्रस्तावानुसार, शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या स्मार्टफोन वापरावर नियंत्रण ठेवणे आता अनिवार्य असणार आहे. चिल्ड्रन्स वेलबीइंग अँड स्कूल्स बिल (Children’s Wellbeing and Schools Bill) मध्ये सुधारणा करून हा नियम लागू केला जाईल. ज्यामुळे शाळांना स्पष्ट मार्गदर्शक सूचना मिळतील. इंग्लंडमधील शिक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, यामुळे शाळांमधील मुलांची शिस्त वाढेल आणि अभ्यासासाठी पोषक वातावरण तयार होईल.
का घेण्यात आला हा निर्णय?
स्मार्टफोनमुळे मुलांचे लक्ष विचलित होते आणि त्यांच्या अभ्यासावर त्याचा विपरीत परिणाम होतो. सोशल मीडिया आणि गेमिंगमुळे वर्गातील एकाग्रता कमी होऊन शिकण्याच्या गुणवत्तेवर परिणाम होत असल्याचे शिक्षण तज्ज्ञांचे मत आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित करण्यास प्रवृत्त करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे, असे बोलले जात आहे.
Comments are closed.