अनिल कपूर यांच्या लेकानं मुंबईत खरेदी केलं 5 कोटींचं आलिशान अपार्टमेंट
अनिल कपूर मुलगा हर्ष वरधन कपूर यांनी 5 कोटी रुपयांची अपार्टमेंट खरेदी केली: बॉलिवूड अभिनेता (Bollywood Actor) हर्षवर्धन कपूरनं (Harsh Varrdhan Kapoor) कपूर कुटुंबाच्या (Kapoor Family) प्रचंड मोठ्या अशा रिअल इस्टेट पोर्टफोलिओमध्ये आणखी एका मालमत्तेची भर घातली आहे. सुपरस्टार अनिल कपूर यांचा मुलगा हर्षवर्धननं मुंबईत 5 कोटी रुपयांचं आलिशान अपार्टमेंट खरेदी केल्याची माहिती मिळतेय. अर्जुनच्या बॉलिवूड कारकीर्दीबाबत बोलायचं झालं तर, त्यानं त्याच्या कारकिर्दीत फक्त तीनच सिनेमांमध्ये काम केलं आहे.
स्क्वेअर यार्ड्सनं दिलेल्या माहितीनुसार, हर्षवर्धन कपूरचं हे अपार्टमेंट 1165 चौरस फूट क्षेत्रात पसरलेला आहे. तो द स्मोकी हिल सीएचएस लिमिटेडमध्ये आहे. हा व्यवहार ऑगस्ट 2025 मध्ये झाला. 5 कोटी रुपयांच्या या व्यवहारावर 30 लाख रुपये स्टॅम्प ड्युटी आणि 30 हजार रुपये नोंदणी शुल्क आहे. या फ्लॅटचा बिल्ट-अप एरिया 108.25 चौरस फूट आहे आणि कार्पेट एरिया 90 (970.71 चौरस फूट) चौरस फूट आहे. येथे एक गॅरेज देखील आहे.
हर्षवर्धन कपूरनं खरेदी केलेल्या अपार्टमेंटची वैशिष्ट्य
मीडिया रिपोर्टनुसार, ज्या ठिकाणी हे अपार्टमेंट आहे, ते ठिकाण वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) आणि लोअर परेल सारख्या प्रसिद्ध केंद्रांशी जोडलेलं आहे. त्या ठिकाणाहून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत देखील सहज पोहोचता येतं.
हर्षवर्धन कपूरचे बॉलिवूड सिनेमे
अनिल कपूरच्या मुलानं राकेश ओम प्रकाश मेहरा यांच्या 2016 मध्ये रिलीज झालेल्या ‘मिर्झिया’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. त्यानंतर तो विक्रमादित्य मोटवानीच्या ‘भावेश जोशी सुपरहिरो’ मध्ये दिसला. दुसऱ्यांदा त्याचं नशीब त्याला साथ देत नव्हतं आणि हा चित्रपटही फ्लॉप झाला. त्यानंतर ‘एके विरुद्ध एके’मध्ये त्याचा कॅमिओ होता. त्यानंतर तो त्याच्या वडिलांसोबत ‘थार’ मध्ये दिसला. हा सिनेमा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला. त्यानंतर तो कोणत्याही प्रोजेक्टमध्ये दिसला नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
आणखी वाचा
Comments are closed.