राज ठाकरेंचे शब्द जिव्हारी लागले, पिट्या भाईने एका रात्रीत गेम फिरवला; पुण्यात मनसेला धक्का
पित्या भाई राज ठाकरे मनसे सोडून भाजपमध्ये दाखल सध्या राज्याच्या राजकीय (Maharashtra Politics) वर्तुळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं (Local Body Elections) बिगुल वाजलंय. सगळीकडे निवडणुकांचे वारे वाहत असतानाच प्रत्येक पक्षात स्थानिक पातळीवर अनेक महत्त्वाचे बदल होत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच, आता पुण्यात राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या मनसेला (MNS) मोठा धक्का बसल्याचं पाहायला मिळत आहे. पिट्या भाई (Pitya Bhai) म्हणजेच, अभिनेता रमेश परदेशी (Ramesh Pardeshi) यानं राज ठाकरेंच्या मनसेची साथ सोडली असून आता भाजपचं (BJP) कमळ हाती घेतलं आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, पिट्या भाईसोबतच पुण्यातील (Pune) मनसेच्या पदाधिकाऱ्यांन भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे आता पुण्यात मनसेला मोठं खिंडार पडल्याचं दिसतंय.
पुण्यातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून त्यामुळे आता पुण्यात मनसेला मोठं खिंडार पडलंय. अभिनेता रमेश परदेशीसोबत पुण्यातील मनसे चित्रपट सेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय.
पिट्या भाईसोबतच मनसेचे इतर पदाधिकारीही भाजपमध्ये
पिट्या भाईला राज ठाकरेंनी झापल्यापासूनच तो नाराज असल्याची चर्चा रंगलेली. अखेर त्यानं मनसेची साथ सोडून भाजपचा झेंडा हाती घेतला. पण, पिट्या भाईनं उचललेल्या या पावलामुळे पुण्यात एका रात्रीतचं पुण्यात मनसे चित्रपट सेनेला मोठं खिंडार पडलंय. पिट्या भाईसोबतच पुण्यातील मनसेच्या इतर पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. भाजपचे प्रदेधाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पिट्याभाई आणि त्याच्यासोबत असलेल्या इतर मनसे चित्रपट सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय.
पिट्या भाईनं मनसेची साथ सोडण्याचं कारण काय?
अभिनेता रमेश परदेशी म्हणजे, पिट्या भाई भाजपात जाणार असल्याची चर्चा बऱ्याच काळापासून रंगलेली. त्याला कारण होतं, स्वतः राज ठाकरेंनी पिट्या भाईंचा केलेला पाणउतारा. त्याचं झालेलं असं की, रमेश परदेशीनं आपल्या सोशल मीडियावर संघाच्या गणवेशातला एक फोटो पोस्ट केलेला. मी माझ्या विचारांसोबत असा मजकूर त्यानं या फोटोसोबत लिहिलेला. काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुणे दौऱ्यावर असताना पिट्या भाईच्या याच पोस्टवरून झाप झाप झापलं होतं. त्यानंतर पुन्हा रमेश परदेशीनं सूचक पोस्ट केलेली. आपण नव्या जबाबदारीसाठी सज्ज असल्याचं त्यानं आपल्या पोस्टमध्ये म्हटलेलं. अखेर पिट्या भाईनं भाजपमध्ये प्रवेश करुन कमळ हाती घेतलं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
आणखी वाचा
Comments are closed.