जानेवारीपासून ATM मधून PF चे पैसे काढता येणार, नोकरदारांसाठी EPFO कडून नवे बदल लागू होणार


ईपीएफओ मुंबई : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना लवकरच मोठी सुविधा उपलब्ध करुन देणार आहे. जानेवारी 2026 पासून कर्मचारी त्यांच्या फंडात जमा असलेल्या रकमेपैकी काही रक्कम एटीएमच्या माध्यमातून काढण्याची सुविधा देण्याबाबत विचार करत आहे. एका रिपोर्टनुसार ईपीएफओ संदर्भातील निर्णय घेणारं मंडळ सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजची बैठक ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात होणार आहे. त्या बैठकीत या सुविधेला मंजुरी दिली जाईल.

PF Withdrawal from EPFO : पीएफ रक्कम ATM मधून काढता येणार

मनी कंट्रोलच्या रिपोर्टनुसार, सेट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजच्या एका सदस्यानं म्हटलं की ईपीएफओचं आयटी इन्फ्रास्ट्रक्चर आता अशा प्रकारचे व्यवहार कण्यास तयार आहे. एटीएममधून काढण्यात येणाऱ्या रकमेच्या मर्यादेबाबत अजून निर्णय व्हायचा आहे. सध्या ईपीएफओचा एकूण फंड 28 लाख कोटी रुपयांहून अधिक असून त्याचे जवळपास 7 कोटी 80 सदस्य आहेत. श्रम मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानुसार ही सुविधा आवश्यक आहे. ज्यामुळं कर्मचाऱ्यांना त्यांच्या फंडातील रकमेचा वापर सहजपणे करता येईल. मंत्रालयाकडून ही सुविधा लागू करण्यासाठी बँका आणि आरबीआय सोबत चर्चा केल्या आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार ईपीएफओ त्यांच्या सदस्यांसाठी विशेष कार्ड जारी करु शकतं. ज्या द्वारे एटीएपमधून त्यांच्या फंडातील रकमेपैकी काही रक्कम काढू शकतात. जाणकरांच्या मते ही सुविधा अडचणीच्या काळात सदस्यांना फंडातील रकमेचा वापर करणं सोपं केल. सध्या पीएफ खात्यातील रक्कम काढण्यासाठी  लागणारा वेळ अधिक असतो. तज्ज्ञांच्या पीएफ खात्यातील पैसे एटीएममधून काढण्याची प्रक्रिया सुरुकरण्यासाठी ईपीएफओला त्यांचं डिजीटल इन्फ्रास्ट्रक्चर आणि बँकिंग सिस्टीमसोबचा समन्वय मजबूत करावा लागेल.

पीएफ खात्यातून पैसे काढण्यासाठी काय करावं लागतं?

पीएफ खात्यातून पैसे काढण्यासाठी ईपीएफओच्या यूएएन पोर्टलला भेट द्यावी लागते. यूएएन पोर्टलला भेट दिल्यानंतर यूएएन क्रमांक आणि पासवर्ड नोंदवून लॉगीन केल्यानंतर मोबाईल फोनवर ओटीपी येतो तो नोंदवावा लागतो. त्यानंतर क्लेम फॉर्म भरुन द्यावा लागतो. क्लेम फॉर्म भरताना कोणत्या कारणासाठी पीएफची रक्कम काढायची आहे. ते नोंदवावं लागते. त्यामध्ये आजारपण, घर बांधणी, घर दुरुस्ती, लग्न, मुलांचं शिक्षण यासह इतर कारणांसाठी पैसे काढता येतात. त्यासाठी वेगवेगळे नियम आहेत.

पासबुक लाईट सुविधा सुरु

ईपीएफओ खात्यात किती रक्कम शिल्लक आहे. या संदर्भातील माहिती तपासण्यासाठी मेंबर पासबूक अशी स्वतंत्र वेबसाईट आहे. याशिवाय ईपीएफओनं नवी सुविधा सुरु करत मेंबर यूएएन पोर्टलवर पासबुक लाईट सुविधा सुरु केली आहे. यामुळं एकाच पोर्टलवर पीएफ खात्यात किती शिल्लक रक्कम आहे ते पाहता येईल.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.