रजनीश काकडे यांच्या छायाचित्रांचे उद्यापासून प्रदर्शन; उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार उद्घाटन
दिवंगत ज्येष्ठ छायाचित्रकार व मुंबई प्रेस क्लबचे माजी पदाधिकारी रजनीश काकडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांच्या छायाचित्रांचे विशेष प्रदर्शन शुक्रवार, 8 मेपासून प्रेस क्लबमध्ये आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन जागतिक ख्यातीचे छायाचित्रकार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे.
रजनीश काकडे यांनी ‘असोसिएटेड प्रेस’ (एपी) या आंतरराष्ट्रीय वृत व छायाचित्र संस्थेत छायाचित्रकार म्हणून काम केले होते. त्यांच्या छायाचित्रांतून अनेक नागरी समस्यांना वाचा फुटली. सामाजिक विषय जगाच्या पटलावर आले. राजकीय घडामोडी समाजापर्यंत पोहोचल्या. पत्रकारिता आणि प्रेस क्लबसाठी काकडे यांनी दिलेले योगदान या प्रदर्शनाच्या माध्यमातून अधोरेखित होणार आहे. 8 मे रोजी सायंकाळी 6 वाजता उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे.
Comments are closed.