निर्यात मालाची चोरी, सीएफएसचा परवाना निलंबित

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

निर्यात मालाच्या चोरीप्रकरणी उरण – द्रोणागिरी नोडमधील डीआरटी कॉनकोआर सीएफएसचा कंटेनर मालवाहतूक आयात-निर्यात परवाना निलंबित करण्यात आला आहे. न्हावा-शेवा सीमाशुल्क विभागाचे आयुक्त उन्मेश शरद वाघ यांनी केलेल्या कारवाईमुळे मालवाहतूक सीएफएसमालकांचे धाबे दणाणले आहेत. द्रोणागिरी नोडमधील डीआरटी कॉनकोआर सीएफएस कार्यरत आहे. या सीएफएसमधून दररोज शेकडो कंटेनरची आयात-निर्यात केली जाते. सर्व सेवा पुरवठादारांना सुरक्षा उपाय अधिक मजबूत करण्याचे आणि एचसीसीएआर २००९ चे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले होते.

Comments are closed.