भारताचा पाकवर विजय, भारतीय क्रिकेटपटूंचा डान्सचा व्हिडिओ व्हायरल, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर
विश्वस बातम्या (नवी दिल्ली): चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये भारतानं पाकिस्तानला पराभूत करत स्पर्धेतील दुसरा विजय मिळवला आहे. भारतानं रविवारी (23 फेब्रुवारी ) ला झालेल्या सामन्यात पाकिस्तानला 6 विकेटनं पराभूत केलं. या दरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये रोहित शर्मा, विराट कोहली सह इतर खेळाडू डान्स करताना पाहायला मिळत आहेत. काही यूजर्स व्हिडीओ शेअर करत सध्याचा व्हिडीओ असल्याचं सांगत आहेत. दावा केला जातोय की चॅम्पियन्स ट्रॉफीत पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर सर्व खेळाडूंनी जल्लोष केलाय.
विश्वास न्यूजनं दाव्याची पडताळणी केली असता तो व्हिडिओ 2024 मध्ये झालेल्या टी 20 वर्ल्ड कपमधील आहे. त्यावेळी भारतीय संघानं टी 20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर वानखेडे स्टेडियमवर जल्लोष केला होता. तिथं भारतीय खेळाडूंनी डान्स केलेला. त्याचा व्हिडिओ आताचा सांगून शेअर केला जात आहे.
फेसबुक वापरकर्ता ‘Pratosh K Karn’ यानं 23 फेब्रुवारी 2025 ला व्हायरल व्हिडिओ सेअर करत ऐतिहासिक विजय असं म्हटलं.
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या ग्रुप लीगमध्ये भारतीय क्रिकेट संघानं दमदार कामगिरी करत पाकिस्तानला पराभूत केलं. टीम इंडियाच्या या गौरवशाली कामगिरीनंतर सर्व खेळाडूंनी एकत्र होत डान्स केला, हा फक्त एक विजय नाही तर भारताच्या क्रिकेटच्या श्रेष्ठतचं उदाहरण आहे. विराट तर विराट आहे, जय हिंद जय भारत…
पोस्टची अर्काईव्हची लिंक इथ पाहा…
सोशल मीडियावर काही यूजर्सनं हा व्हिडिओ त्याच दाव्यासह शेअर केला आहे.
क्रिकेट किंग विराट कोहलीचे तेजस्वी शतक
राजा कोहली 💯 🥳 🥳 51*शतक
नृत्य केले आहे
भारतीय संघाला शुभेच्छा#Indvspak #Viratkohli 𓃵 #चॅम्पियन्सस्ट्रॉफी 2025 pic.twitter.com/r6fekmbyof– ज्युली शर्मा (मोदींचे कुटुंब) (@ज्युलिश 95316387) 23 फेब्रुवारी, 2025
पडताळणी
व्हायरल पोस्टची सत्यता जाणून घेण्यासाठी आम्ही व्हिडिओच्या की फ्रेम काढून गुगल लेन्सच्या मदतीनं सर्च केल्या. आम्हाला बीसीसीआयच्या अधिकृत एक्स हँडलवरील व्हिडिओ मिळाला. व्हिडिओ 5 जुलै 2024 चा आहे. या माहितीनुसार व्हिडिओ वानखेडे स्टेडियमवरील टी 20 वर्ल्ड कपनंतरचा आहे.
त्या हालचालींकडे लक्ष द्या 🕺🏻
काल रात्री वानखेडे हा एक आवाज होता 🥳#T20worldcup | #Teamindia | #चॅम्पियन्स pic.twitter.com/hrbtcu9bxc
– बीसीसीआय (@बीसीसीआय) 5 जुलै, 2024
शोध सुरु असताना आम्हाला व्हिडिओशी संबंधित एएनआयच्या वेबसाईटवर बातमी मिळाली. रिपोर्ट 5 जुलै 2024 ला प्रकाशित करण्यात आला आहे. बातमीनुसार, टी 20 वर्ल्ड कपमध्ये विजय मिळवल्यानंतर भारतीय टीमनं दक्षिण आफ्रिकेला पराभूत करुन टी 20 वर्ल्ड कप जिंकला होता. त्याचा जल्लोष वानखेडे स्टेडियमवर आयोजित करण्यात आला होता. तिथं खेळाडूंनी डान्स केला.
व्हायरल व्हिडिओशी संबंधित अन्य बातम्या इथं वाचू शकता. ज्या 2024 च्या टी 20 वर्ल्ड कपच्या असल्याचं सांगण्यात आलं आहे.
अधिक माहितीसाठी आम्ही दैनिक जागरणचे स्पोर्ट्स एडिटर अभिषेक त्रिपाठी यांच्याशी संपर्क केला. त्यांनी हा व्हायरल व्हिडिओ टी 20 वर्ल्ड कपचा असल्याचं सांगितलं.
चॅम्पियन्स ट्रॉफीत भारतानं दोन विजय मिळवले आहेत. 23 फेब्रुवारी 2025 ला पाकिस्तान विरुद्ध झालेल्या मॅचमध्ये भारतानं 6 विकेटनं विजय मिळवला होता. भारतीय संघाला 242 धावांचं आव्हान मिळालं होतं. ते 42.3 ओव्हरमध्ये पूर्ण करत भारतानं विजय मिळवला.
शेवटी आम्ही हा व्हिडिओ शेअर करणाऱ्या यूजर्सच्या अकाऊंटची पडताळणी केली. या व्यक्तीला चार हजार लोक फॉलोअर्स करतात. यूजर्नं तो दरभंगा येथील असल्याचं सांगितलं आहे.
निष्कर्ष : विश्वास न्यूजच्या पडताळणीत हे सत्य समोर आलं की भारतीय खेळाडूंचा व्हिडिओ अलीकडील नाही. तो 2024 च्या टी 20 वर्ल्ड कप विजयानंतरचा आहे. भारतानं दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत टी 20 वर्ल्ड कप जिंकला होता. त्यानंतर मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर जल्लोष करण्यात आला होता. तो व्हिडिओ लोक आताचा सांगून शेअर करत आहेत. व्हिडिओ सध्याचा नसून चॅम्पियन्स ट्रॉफीचा संबंध नाही हे स्पष्ट झालं आहे.
Claim Review : चॅम्पियन्स ट्रॉफीत पाकिस्तानला हरवून टीम इंडियाचा डान्स
द्वारा दावा: एफबी वापरकर्ता- प्रातोष के खान
तथ्य तपासणी: दिशाभूल करणे
[डिस्क्लेमर: ही बातमी पहिल्यांदा विश्वास न्यूजवर प्रकाशित झाली होती. एबीपी माझानं ‘Shakti Collective’ अंतर्गत हे वृत्त प्रकाशित केलं असून मूळ बातमीचा अर्थ बदलेलं असा कोणताही बदल केलेला नाही.]
अधिक पाहा..
Comments are closed.