विदर्भातील पाच जिह्यांत 312 शेतकऱ्यांच्या आत्महत्या, अमरावती, अकोल्यात सर्वाधिक

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा आणि वाशिम या पश्चिम विदर्भातील शेतकऱयांच्या आत्महत्येचे सत्र अद्याप थांबले नाही. या भागात अवघ्या 150 दिवसांमध्ये तब्बल 312 शेतकऱ्यांनी मृत्यूचा फास आपल्या गळ्याभोवती आवळल्याचे समोर आले आहे.

पश्चिम विदर्भात 2001 पासून आतापर्यंत 22 हजार 490 शेतकऱयांनी आत्महत्या केल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे. पश्चिम विदर्भातील सर्वाधिक 105 आत्महत्या एकटय़ा यवतमाळ जिह्यात झाल्या आहेत, तर अमरावती (62), अकोला (59), बुलढाणा (40) आणि वाशिममध्ये (46) शेतकरी मृत्युमुखी पडले आहेत. जानेवारीमध्ये 62, फेब्रुवारीमध्ये 59, मार्चमध्ये 67, एप्रिलमध्ये 74 आणि मे महिन्यात 50 शेतकऱयांनी टोकाचे पाऊल उचलत आपले जीवन संपवले आहे. नैसर्गिक आपत्ती, बँकांसह सावकारांचे कर्ज, वसुलीसाठी तगादा, मुलींच्या लग्नासाठी झालेला खर्च, आजारपण यांसारख्या वेगवेगळ्या समस्यांनी शेतकरी त्रस्त झाला आहे.

कर्जाचा डोंगर वाढता वाढे

शेतकऱ्यांना विविध कारणांसाठी कर्ज घ्यावे लागते. बँकांचे कर्ज आणि त्यावरील चक्रवाढ व्याज यामुळे कर्जबाजारी होत असून खासगी सावकारांकडून होणारी वसुली आत्महत्येला प्रवृत्त करतेय.

Comments are closed.