स्वतःच्या आईसोबतचे अनैतिक संबंध उजेडात आल्यानं नराधम बापाने पोटच्या चिमुरडीला संपवलं, सोलापूर ह
सोलापूर गुन्हा: दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुसूर गावात एक संतापजनक घटना समोर आली आहे. स्वतःच्या आईसोबत असलेल्या अनैतिक संबंधांची वाच्यता होऊ नये यासाठी एका नराधम बापाने स्वतःच्या पोटच्या आठ वर्षांच्या चिमुकलीची गळा दाबून निर्घृण हत्या केली. आरोपी ओगसिद्ध कोठे याला पोलिसांनी (Police) अटक केली असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Solapur Crime News)
शुक्रवारी (दि. 23 मे) संध्याकाळच्या सुमारास कुसूर गावात एका आठ वर्षांच्या मुलीचा मृतदेह जमिनीत पुरलेल्या अवस्थेत आढळून आला होता. सुरुवातीला पोलिसांनी ही बाब आकस्मिक मृत्यू म्हणून नोंदवली होती. मात्र मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असता, गळा दाबून हत्या केल्याचे स्पष्ट झाले.
आरोपीचे स्वतःच्याच आईसोबत अनैतिक संबंध
या प्रकरणात मंद्रूप पोलीस ठाण्यात सहा पोलीस निरीक्षक मनोज पवार यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपी ओगसिद्ध कोठे याचे स्वतःच्याच आईसोबत अनैतिक संबंध होते. मृत चिमुकली श्रावणी हिने स्वतःच्या वडिलांना आणि आजीला आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले होते. या प्रकाराबाबत श्रावणीने कोणाला काही सांगू नये म्हणून नराधम बापाने तिला आधी बेदम मारहाण केली होती.
चिमुकलीचा गळा दाबून खून
यानंतर पत्नी वनिता कोठे घरी नसताना नराधम बापाने चिमुकलीचा गळा दाबून खून केला. इतक्यावरच न थांबता, मृतदेह घरासमोरच खड्डा खोदून पुरण्यात आला. गावातील पोलीस पाटील महानंदा पाटील यांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तत्काळ पोलीस प्रशासनाला खबर दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मुलीचा मृतदेह बाहेर काढून तपास सुरू केला. या प्रकरणी आरोपी ओगसिद्ध कोठे याला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत असून, आरोपीवर कडक कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
सोलापुरात गोठा कोसळून वृद्ध महिलेचा मृत्यू
दरम्यान, मोहोळ तालुक्यातील शिरापूर गावात गोठा कोसळून वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तानुबाई मारुती गायकवाड असे मृत्यू झालेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे. शुक्रवारी संध्याकाळी वादळी वाऱ्यासह जोराचा पाऊस सुरू असताना तानुबाई गायकवाड या जनावरांच्या गोठ्यात बसल्या होत्या. त्यावेळी अचानक गोठा कोसळला आणि तानुबाई गायकवाड या गोठ्यात अडकल्या. संध्याकाळी कुटुंबीय ज्यावेळी शेतात आले तेव्हा त्यांना तानुबाई या गोठ्याखाली अडकलेल्या अवस्थेत दिसल्या. त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलं. या घटनेची नोंद मोहोळ पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq
आणखी वाचा
अधिक पाहा..
Comments are closed.