'फौजी' डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
पॅन-इंडिया सुपरस्टार प्रभासचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘फौजी’च्या प्रदर्शनाची तारीख समोर आली आहे. निर्मात्यांनी चित्रपटाचे एक पोस्टर जारी करत याची घोषणा केली आहे. पोस्टरमध्ये प्रभास युद्धभूमीवर पावसात भिजत असल्याचे दाखविण्यात आले आहे. त्याच्या हातांमध्ये बंदुक असून शरीर रक्ताने माखलेले असल्याचे पोस्टरमध्ये दर्शविण्यात आले आहे. ‘अज्ञातपर्वाचा अंत, बंडाची सुरुवात’ अशी कॅप्शन पोस्टरला देत निर्मात्यांनी हा चित्रपट 3 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. निर्मात्यांनी शेअर केलेल्या पोस्टरमध्ये प्रभास मृतदेहांचा खच पडलेल्या युद्धभूमीत असून त्याच्या हातांमध्ये बंदुक असल्याचे दिसून येते. या चित्रपटाचे दिग्दर्शन हनु राघवपुडी यांनी केले आहे. फौजी हा चित्रपट एका वीर योद्ध्याची कहाणी असल्याचे निर्मात्यांनी सांगितले आहे. या चित्रपटाची कहाणी 1945 सालची दर्शविण्यात आली आहे. याची पटकथा प्रभासला डोळ्यासमोर ठेवून तयार करण्यात आल्याचे राघवपुडी यांनी सांगितले आहे. मूळ रुपात तेलगू भाषेत निर्मित फौजी चित्रपट हिंदी डब वर्जनमध्येही प्रदर्शित होणार आहे.
Comments are closed.